fbpx

आयुष्मान खुरानाचे नवीन जाहिरातपटांमध्ये ‘डोके ताळ्यावर’!

मुंबई : घराच्या सुरक्षिततेबाबत योग्य ती उपाययोजना केल्यानंतरआपल्याला घराबाहेर असतानाही फारशी काळजी करण्याचे कारण उरत नाहीअसे बॉलीवूड स्टार आयुष्मान खुराना याने गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्सच्या जाहिरातपटांत आपल्या आयकॉनिक अंदाजामध्ये नुकतेच दाखविले होते.

या जाहिरातपटांना ‘पीस ऑफ माइंड’ असे शीर्षक देण्यात आले असून त्यांत आयुष्मानला तीन वेगवेगळ्या वेषभूषांमध्ये दाखवण्यात आले होते. यात तो एकदा प्रवासातएकदा बाजारात आणि एकदा त्याच्या ‘मित्राच्या लग्नात असलेला दाखविण्यात आला होता. आयुष्मानने अलीकडेच त्याच्या इंस्टाग्रामवर या जाहिरातपटांमधील ‘पडद्यामागील’ दृष्येदेखील पोस्ट केली होती.

कामानिमित्त अनेकदा प्रवास करणाऱ्यांना त्यांच्या घरातील मौल्यवान वस्तूंविषयी जी काळजी वाटत राहतेती मी समजू शकतो; कारण मलाही अनेकदा प्रवास करावा लागतो. ही काळजी केवळ घरातील मौल्यवान वस्तूंबद्दलच असते असे नाहीतर आपल्या प्रियजनांना घरी एकटे सोडण्याबद्दलदेखील ती वाटत असते. आपली घरे बांधताना आपण जी पहिली गोष्ट केली पाहिजे ती म्हणजे घराची सुरक्षितता जपणे; मग ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये गुंतवणूक करणे असो किंवा घरातल्या लॉकरवर विश्वास ठेवणे असो! माझ्या घरात लहानपणापासूनच मी गोदरेजची लॉकर्स पाहत आलेलो आहे आणि म्हणूनच आज गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्सचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून प्रतिनिधित्व करणे हे माझ्यासाठी खूप आनंददायी आहे. आजच्या जगातील इतर सर्व गोष्टींप्रमाणेच, ‘गोदरेजच्या सुरक्षा उत्पादनांमध्ये आणि ब्रँडमध्येदेखील कालानुरुप सुधारणा झाल्या आहेत. माझ्या घराप्रमाणेच माझे डिजिटल लॉकर हे माझे सर्वात सुरक्षित ठिकाण आहे. माझे गोदरेज कॅमेरे मला जगातील कोठूनही माझ्या प्रियजनांवर लक्ष ठेवण्यास मदत करतात. जवळपास प्रत्येक भारतीय कुटुंबाप्रमाणे माझ्या कुटुंबाचादेखील गोदरेज लॉकरवर अतूट विश्वास आहे. गोदरेजच्या तिजोऱ्या या नेहमीच विश्वासार्ह ठरलेल्या आहेत आणि पिढ्यानपिढ्या त्या तशाच दर्जाच्या होत आहेत. मला खात्री आहे की पुढच्या पिढ्याही आपल्या मौल्यवान वस्तूंचे आणि घरांचे रक्षण करण्यासाठी गोदरेजवरच विश्वास ठेवतील”असे प्रतिपादन गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन्सचा ब्रँड अॅम्बेसेडर आयुष्मान खुराना याने केले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: