Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

संतूर आणि व्हायोलीन वादनाने रंगणार स्वरपर्व

पुणे : पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मा यांचे शिष्य डॉ. शंतनू गोखले यांचे संतूर वादन आणि स्वरप्रज्ञ पंडित मिलिंद रायकर यांचे सुपुत्र व शिष्य यज्ञेश रायकर यांच्या व्हायोलीन वादनाचा आनंद पुणेकर रसिकांना घेता येणार आहे. निमित्त आहे तालानुभूती फाउंडेशन, परिमल व प्रमोद चौधरी फाउंडेशन आणि विलास जावडेकर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘स्वरपर्व’ – पर्व नव्या दमाच्या आश्वासक स्वरांचे या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे. सदर कार्यक्रम मयूर कॉलनी, कोथरूड येथील बाल शिक्षण मंदिर प्रशालेच्या इमारतीमध्ये असलेल्या एमईएस सभागृहात शुक्रवार, दिनांक ७ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६ वाजता संपन्न होईल. कार्यक्रमासाठी रसिकांना प्रवेश विनामूल्य असेल. या दोन्ही प्रमुख कलाकारांना तबल्यावर साथ अनुक्रमे रोहित मुजुमदार आणि प्रणव गुरव करतील.

शास्त्रीय संगीतातील नव्या पिढीला आपली कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या हेतूने तालानुभूती फाउंडेशनच्या तर्फे ‘स्वरपर्व’ या उपक्रमाला गेल्या वर्षी सुरुवात करण्यात आली. या उपक्रमातील हा चौथा कार्यक्रम आहे. याआधी झालेल्या कार्यक्रमांमध्ये अंकिता जोशी, अभिषेक बोरकर, विराज जोशी, मेहताब अली नियाजी, ईशान घोष, निनाद दैठणकर, मेहेर परळीकर, सौरभ वर्तक आदी कलाकारांनी आपली कला सादर केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading