fbpx

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील शैक्षणिक शुल्कात अवाढव्य वाढ

कोरोना काळातील शुल्काचा अधिभार आता लावण्यात येतोय, परंतु विद्यार्थी ही अवाजवी शुल्क भरणार कशी? – अभाविप

पुणे:सावित्रीबाई फुले पुणे विद्यपीठातील जवळपास सर्व विभागांचे शैक्षणीक शुल्क दुपटीने वाढवण्यात आले आहे. याच विषयाला घेऊन आज अभाविप कडून विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. कारभारी काळे यांना कुलसचिव प्रफुल्ल पवार, परीक्षा संचालक डॉ. महेश काकडे यांच्या समक्ष अभाविप च्या वतीने निवेदन देण्यात आले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात जगभरातून विद्यार्थी शिकण्यासाठी येतात मात्र या ठिकाणी ग्रामीण भागातून शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांची ही संख्या अधिक आहे. प्रत्येकच विद्यार्थ्याला हे अवाढव्य पणे वाढलेले शुल्क भरणे शक्य नाही. विद्यापीठात अनेक विद्यार्थी “कमवा-शिका” अंतर्गत आपले शिक्षण पूर्ण करतात. विद्यापीठाकडून यावर्षी अनेक कोर्सेस च्या शुल्कामध्ये अवाजवी पणे वाढ करण्यात आली आहे.

पुंबा विभागातील “बी बी ए” या कोर्स ची फी १६ हजार रुपयांनी वाढवण्यात आली आहे.तर,गणित विषयाच्या विद्यार्थ्यांकडून लॅबोरेटरी शुल्क आकारण्यात आली आहे. एम कॉम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची सुद्धा शुल्क अवाजवी वाढवण्यात आली. शुल्कामध्ये अचानक केलेला हा बदल अवाजवी आहे. विद्यार्थी एवढी अवाढव्य शुल्क भरू शकणार नाहीत. ही शुल्क लवकरात लवकर पूर्ववत करावी, आणि विद्यार्थ्यांची अडचण सोडवावी अन्यथा विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा पवित्रा विद्यार्थ्यांनी अभाविप च्या माध्यमातून कुलगुरू समोर ठेवला.

सदर शुल्कवाढ कोरोना नंतर करण्यात आली आहे. मागील कालावधीत शुल्क वाढ झाली नाही, म्हणून त्या वर्षांचा अधिभार आता लावण्यात येत आहे, असे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी अभाविप च्या शिष्टमंडळाला सांगितले.

मात्र सदर शुल्क वाढ सामान्य विद्यार्थ्यांनी भरायची कशी? असा प्रतिप्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला. सोबतच, ही शुल्क वाढ रद्द करावी, अन्यथा विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वेळप्रसंगी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल, असा इशारा विद्यापीठ अध्यक्ष महादेव रंगा यांनी कुलगुरूंना दिला. यावेळी अभाविप विद्यापीठ शाखा उपाध्यक्ष वैभव मुंडे, शशांक जलज, गौरव महाजन, कुलदीप सिंह व अन्य विद्यार्थी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: