fbpx
Saturday, December 2, 2023
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

लोन ॲप फसवणूक प्रकरणात पुणे पोलिसांनी 18 आरोपींना अटक केली

पुणे: पुणे सायबर पोलिसांनी आत्ता पर्यंतची सर्वात मोठी कामगिरी केली असून फ्रॉड लोन ॲपचे कॉल सेंटर पुणे सायबर पोलिसांनी उध्वस्त केलं आहे. 18 आरोपींना अटक करण्यात आली आहे.हे फ्रॉड लोनच ॲपद्वारे हजारो नागरिकांची फसवणूक झाली असून याचा थेट संबंध हे विदेशी लोकांपर्यंत होत.पुणे पोलिसांकडून याचा तपास हा केला जात असून आत्ता या प्रकरणी 18 जणांना अटक करून मोठ्या प्रमाणात या लोकांकडून मुद्देमाल जप्त करण्यात करण्यात आला आहे. अशी माहिती पुण्यातील पत्रकार परिषदेत पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.


अमिताभ गुप्ता म्हणाले,ऑनलाईन लोन एप्लीकेशन वरून इस्टेट लोन देण्याच्या नावाखाली काही एप्लीकेशन गुगल प्ले स्टोअर तसेच खाजगी वेबसाईटवर नागरिकांना डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करुन दिले जातात. यातील काही लोन अॅप्लीकेशन्स द्वारे युजरला किमान 500/- रुपया पासुन ते कमाल 7000/- रुपयापर्यंतचे तात्काळ कर्ज दिले जाते. अश्या या लोन अॅप्लीकेशन्स युजरच्या हॅन्डसेट मध्ये डाऊनलोड करुन ते चालू झाल्यानंतर युजरच्या हॅन्डसेटचा परमिशन Allow करण्याचा मेसेज मोबाईलच्या होम स्क्रिन वर प्राप्त होतो. या सर्व परमिशन युजरने दिल्यानंतर युजरच्या हॅन्डसेट मधील सर्व डेटाचा अॅक्सेस लोन अॅप्लीकेशन पुरविणा-या कंपनीस जातो. आणि सर्व डेटाचा अॅक्सेस मिळाल्यानंतर तो सर्व डेटा कंपनी क्लोन करुन त्याच्या सव्हरवर साठवून ठेवते. आणि मग कर्जाची रक्कम प्रोसेसिंग फी वजा करुन युजरचे अकाऊंट मध्ये डिपॉझिट झाल्यानंतर 7 दिवसाचे आत त्यावर 30 ते 300 टक्क्यापर्यंत अधिकचे व्याज आकारुन त्याची परतफेड करण्यास सांगतात. आणि युजरने जरी कर्जाची रक्कम व त्यावरील आकारलेले मुद्दल व व्याजाची रक्कम भरुन देखील कंपनीने नेमलेल्या कॉलर कडुन युजरला पुन्हा पैसे भरण्यासाठी कॉल येण्यास सुरुवात होते. या कॉलवर सक्तीने पैसे भरण्यासाठी मानसिक त्रास दिला जातो. तसेच पैसे भरण्यास उशीर झाल्यास लोन अॅप्लीकेशन कंपनी द्वारे युजरच्या माहितीचा (फोटो, कॉन्टेक्ट नंबर इत्यादी) गैरवापर करून कर्जफेड करणाऱ्याला मानसिक छळ केला जातो. या मध्ये लोन अँप वापरकर्त्यांचे वैयक्तीक फोटो घेवून व त्याचे मॉफींग (अर्धनग्न / नग्न स्वरुपाचे मॉर्फिग) करून वापरकर्त्यांच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील लोकांना कॉल करुन धमकी, शिवगाळ करुन तसेच टेक्स्ट मॅसेजस, व्हॉटसअॅप मॅसेजेस पाठवुन, लोन अॅप वापरकर्त्यांची बदनामी केली जाते. व त्यांच्या कडून बदनामी न करण्यासाठी वारंवार खंडणी मागुन मोत्या प्रमाणात पैसे घेण्याचे काम केले जाते. या बदनामीची भीतीपोटी लोन अँप वापरकर्ता हा सदर लोन अँप कंपनीने सांगितलेल्या बँक अकाऊंटवर / VPA ID / UPI ID यावर ऑनलाईन पैसे पाठवितात.


अश्या प्रकारचा सायबर गुन्हा संपुर्ण भारतामध्ये होत असुन एकट्या पुणे शहरात सन 2020 ते 2022 (30 ऑगस्ट पर्यंत )  सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे 4778 एवढया मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल झालेल्या आहेत. आणि या प्रकरणाची वरीष्ठ स्तरावर गांभीर्याने दखल घेवून त्याचा सविस्तर तपास करण्याच्या दृष्टीने सायबर पोलीस स्टेशन कडे ऑनलाईन लोन अॅप्लीकेशन फसवणुकी संदर्भात गु.र.नं. 21/2022 भा.द.वि. कलम 384, 385,386, 420, 469, 500, 501, 504, 506, 120 (ब), 34 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 43 (अ)/ 66.66 (डी). 67 प्रमाणे व गु.र.नं. 32/2022 भा.दं.वि. कलम 384, 385 386, 420, 469, 500, 501, 504, 506, 120B, 34 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 43 (a)/66, 43 (6) /66, 66(D), 67 प्रमाणे दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते.आणि त्याचा तपास सुरू होता. असे अमिताभ गुप्ता म्हणाले.
माहितीच्या तांत्रिक विश्लेषणातून पुढे आलेल्या माहितीच्या आधारे आरोपी निष्पन्न करून सायबर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने 1. स्वप्नील हनुमंत नागटिळक, वय – 29 वर्षे, सध्या रा. पापाराम नगर, विजापुर रोड, सोलापुर, मुळ राहणार – वसाहत नं- 2, चाँद तारा मस्जिद समोर, विजापुर सोलापुर. 2. श्रीकृष्ण भिमण्णा गायकवाड, वय – 26 वर्ष, रा. फ्लॅट नं 401, शिवशक्ती चौक, त्रिवेणीनगर, भेकराई नगर, फुरसुंगी, हडपसर, पुणे 3. धिरज भारत पुणेकर वय 36 वर्षे, रा. संजय नगर, कुमले नका, घर नंबर 74. सोलापुर. 4. प्रमोद जेम्स रणसिंग, जय 43 वर्षे, रा. प्रियदर्शनी सोसायटी प्लॅट नंबर 4. समतानगर कुमठे नाका, सोलापुर. 5. सॅम्यु मुमताज सॅम्युअल संपत कुमार, वय 40 वर्ष, रा. 404 एम. को. आर सुर्वे अपार्टमेंट डिकोना रोड, बेलातुर, बेंगलुरू 6. मुजीब कंदीयल पिता इब्राहिम वय • 42, रा. बरोबियल हाउस अरूर पोस्ट. पूरामेरी कोझीकोडे अरूर केरळ – 673507  7. मोहम्मद मनियत पिता मोहिदू वय 32, रा. मनियत हाउस ता. पडघरा जि. कनिकत केरळ अश्या 7 आरोपींना सुरवातीला अटक करण्यात आली आणि त्यांना 10 दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे. या आरोपीने पुणे शहर, सोलपुर शहर, लातूर, जळगाव, बेंगलोर या ठिकाणांहून मजूर लोकांच्या नावे बँक खाते आणि विविध सिम कार्ड कंपनीला पुरवत होते.या आरोपीकडून
मोबाईल हॅन्डसेट सीमकार्ड सह 48, बँक अकाऊंट 56, सीम कार्ड संगणक 1, लॅपटॉप 1, चेकबुक/पासबुक – 27. एअरटेल के आय कंपनीचे मोकळे सीम कार्ड 30. बीट/क्रेडिट कार्ड – 167, पेटीएम स्वाईप मशीन 1, पॅनकार्ड 15, आधारकार्ड 04. 11, मतदार कार्ड 04, शिक्के अस मुद्देमाल हस्तगत करण्यात आलं आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: