fbpx

टीसीआय ग्रुपद्वारे देशभरात रक्तदान शिबिराचे आयोजन

मुंबई : ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे (टीसीआय ग्रुप) संस्थापक अध्यक्ष प्रभू दयाळ अग्रवाल (पीडीजी) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देशभरात २७ हून अधिक ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ८०० हून अधिक जणांनी सहभाग घेतला. ग्रुपकडून दरवर्षी या उपक्रमाचे आयोजन केले जाते. मुंबईत या उपक्रमाचे आयोजन सहारा प्लाझा कॉम्प्लेक्स, जे बी नगर, अंधेरी पूर्व येथे करण्यात आले.

पीडीजी यांना भारतीय वाहतूक उद्योगाचे प्रणेते म्हणून ओळखले जाते. त्यांनी आरोग्य, शिक्षण, महिला सक्षमीकरण इत्यादी क्षेत्रांत मोठे योगदान दिले आहे. भारतातील खाजगी रक्तपेढ्या स्थापन करण्यात त्यांची भूमिका ही प्रमुख क्षेत्रांपैकी एक आहे. पीडीजी यांच्या कामाचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी यावर्षी सप्टेंबर महिन्यात हे शिबिर पार पडले. मुंबई, पुणे, लखनौ, राउरकेला आणि मदुराई, राजकोट, रायपूर, चाकण, हसनगढ, जमशेदपूर, पाटणा यांसारख्या ठिकाणांसह देशभरात २७ हून अधिक ठिकाणे हे शिबिर पार पडले. या मोहिमेमध्ये ८००हून कर्मचारी आणि इतर नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतला.

Leave a Reply

%d bloggers like this: