fbpx

क्रेन इंडिया च्या सातारा येथील नव्या व्हॉल्व कारखान्याचे समारंभपूर्वक उदघाटन

सातारा  : क्रेन इंडिया च्या सातारा येथील नव्या इंजिनिअर्ड चेक व्हॉल्व कारखान्याचे समारंभपूर्वक उदघाटन आज झाले. या समारंभाचे आयोजन क्रेन प्रोसेस फ्लो टेक्नॉलॉजीज इंडिया प्रा. लि., केमफार्मा अँड एनर्जी, ड्युओ चेक आणि नोझ चेक या क्रेन च्या विविध विभागातर्फे करण्यात आले. क्रेन इंडिया  चे अध्यक्ष श्री हरी जिनागा यांच्या नेतृत्वाखाली आणि क्रेन च्या जागतिक स्तरावरील वरिष्ठ अधिका-यांच्या तसेच व्यावसायिक भागीदारांच्या आणि ग्राहकांच्या उपस्थितीत पूर्णतः इंजिनिअर्ड चेक उत्पादनांच्या निर्मितीसाठी उभारलेल्या या कारखान्याचे अनावरण झाले.

क्रेन ची इंजिनिअरिंग मधील अचूकता आणि काही दशकांच्या कालावधीत झालेले संशोधन याचा ठसा या 10,000m2 [approx..110,000sq.ft.]  क्षेत्रफळाच्या कारखान्यात पावलोपावली दिसतो.  स्वयंचलित वेल्डिंग तंत्रज्ञान वापरून येथे ड्युओ चेक आणि नोझ चेक व्हॉल्व च्या ८४ इंच पर्यंतच्या श्रेणीचे उत्पादन येथे होणार आहे.  गुणवत्तेचे अत्यंत कडक निकष या कारखान्याने पूर्ण केले आहेत आणि सर्व उत्पादनांना मान्यता मिळविली आहे. उत्पादनांच्या संपूर्ण श्रेणीचे मशिनिंग याच कारखान्यात करण्याची क्षमता आहे.  कारखान्यात ७२ इंच पर्यंतच्या व्हॉल्व्ह च्या हाय प्रेशर आणि क्रायोजेनिक चाचण्या घेण्याची सोय आहे.  ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार तापमान, दाब, गळतीचे प्रमाण अशा चाचण्यांचे प्रमाणपत्रही उपलब्ध होऊ शकेल.

 या नवीन कारखान्यात १०० व्यक्तींसाठी  रोजगार निर्माण करण्याची क्षमता आहे आणि त्याचा लाभ रसायन उद्योग तसेच ऊर्जा क्षेत्र, पुनर्वापर योग्य ऊर्जा तसेच हायड्रोजन उत्पादन यासारख्या अनेक नव्या उद्योगक्षेत्रांना मिळेल. “क्रेन इंडिया नेत गुणवत्ता येथील उत्पादनांमध्ये राखली जाईल,” असेही  जिनागा म्हणाले.

समारंभाचे आणखी फोटो आणि व्हिडिओ क्रेन इंडिया च्या लिन्कड इन  LinkedIn वर उपलब्ध आहेत. क्रेन केमफार्मा अँड एनर्जी विषयी अधिक माहिती साठी  www.cranecpe.com. या वेबसाईट ला भेट द्या.  गेली 30 वर्षे स्थानिक लोकांच्या हितासाठीच्या विविध उपक्रमांमध्ये गुंतवणूक करुन आणि अन्य मार्गांनी योगदान देऊन भारतीय समाजात एक प्रभावी संस्था म्हणून स्थान मिळविले आहे. आजच्या या नव्या चेक व्हॉल्व कारखान्याच्या उद्घाटनाबरोबरच “माहेर निवासी संकुल” या सातारा जिल्ह्यातील अनाथ बालकांसाठीच्या वसतिगृहाचे उद्घाटन करुन आपली समाजाबद्दलची भावना दृढ केली आहे. माहेर या स्थानिक सेवाभावी संस्थेच्या सहकार्याने हे वसतिगृह चालवले जाईल,” असे क्रेन इंडिया चे अध्यक्ष श्री. हरी जिनागा यांनी सांगितले.

“नव्या इंजिनियर्ड चेक व्हॉल्व कारखान्यात सर्वोत्तम पातळीची यंत्रणा बसविण्यात आली असून डिजिटल परिवर्तनाचे प्रवाह त्यात प्रतिबिंबित झालेले आहेत. येथील उत्पादन पूर्णतः स्वयंचलित असून क्रेन ची सर्वज्ञात गुणवत्ता येथील उत्पादनांमध्ये राखली जाईल,” असेही जिनागा म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: