fbpx

PFI बरोबर भाजपने करार रद्द केला हे त्यांनी तपास यंत्रणांना का सांगितले नाही -प्रदीप देशमुख

पुणे : देशभरात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या कार्यकर्त्यांना देशविघातक कृत्य केल्याच्या संशयावरून राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अटक केल्यानंतर व पुण्यात झालेल्या घोषणाबाजीवरून संशय निर्माण झाल्यानंतर आता पुणे महापालिकेने पीएफआयला स्मशानभूमी व्यवस्थापनाच्या कामावरून राष्ट्रवादी काँग्रेसने मागच्या सत्ताधारी भाजपवर टीका केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदीप देशमुख म्हणाले, केंद्रीय तपास यंत्रणा व्यवस्थित काम करत असतात. कोरोनाच्या काळामध्ये स्मशानभूमीत पुणे महापालिकेची यंत्रणा कमी पडत असल्याने अनेक सामाजिक संस्थांना अंत्यविधीसाठी नियुक्त करण्यात आले होते. त्यावेळी ‘पीएफआय’ला ही काम देण्यात आले होते. आता यावरून राजकारण सुरू झाले आहे. भाजप सत्तेत असताना ‘पीएफआय’ सोबत करार केला. भाजपच्या नेत्यांनी हा करार रद्द करायला लावला. पण त्यांनी या संदर्भातील माहिती तपास यंत्रणांना गेल्या दोन वर्षात का दिली नाही..अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदीप देशमुख यांनी भाजपवर केली आहे. भाजपने याचे उत्तर महाराष्ट्राला दिले पाहिजे असे आम्ही मागणी करत आहोत असे प्रदीप देशमुख म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: