संत निरंकारी मिशनद्वारा धायरी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन …
पुणे : मानवमात्राच्या कल्याणार्थ सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या पावन आशीर्वादाने आणि दिव्य मार्गदर्शनद्वारा पुणे झोन मधील ब्रांच धायरी येथे संत निरंकारी चेरिटेबल फाउंडेशनद्वारा विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन २५ सप्टेंबर २०२२ रोजी करण्यात आले होते. ज्यामध्ये संत निरंकारी मिशनच्या २६३ भक्तांनी निस्वार्थ भावनेने रक्तदान केले. वाय.सी.एम.रुग्णालय रक्तपेढी, संत निरंकारी रक्तपेढी मुंबई यांनी रक्त संकलन केले.
या शिबिराचे उदघाटन ताराचंद करमचंदानी (पुणे झोन प्रभारी ) यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. मिशनचे सचिन जाधव, परमेश्वर हेळकर, पांडुरंग दळवी आदी पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान श्री.भीमराव तापकीर ( आमदार),नगरसेवक प्रसन्नदादा जगताप, संदीप बेलदरे, हरिदास चरवड, माजी नगरसेवक विकास नाना दांगट आदी मान्यवरांनी शिबिरास भेट दिली व रक्तदान शिबिरामध्ये सहभागी झालेल्या रक्तदात्यांना प्रोत्साहित केले तसेच मानवतेच्या या महान कार्यात केलेल्या त्यांच्या या सेवेबद्दल त्यांची प्रशंसा केली.शिबिराच्या यशस्वीतेसाठी मिशनचे सेवादार ,साधसंगत यांनी आजूबाजूच्या परिसरामध्ये रॅलीच्या माध्यमातून तसेच घरोघरी जाऊन नागरिकांमध्ये रक्तदानाविषयी जागरूकता निर्माण केली.
धायरी ब्रांच प्रमुख शाम भागवत यांनी रक्तदान शिबिराला उपस्थित सर्व स्तरातील गणमान्य अतिथी,रक्तदाता,डॉक्टर आणि त्यांच्या टीमचे आभार व्यक्त केले. त्यांनी सांगितले की मिशनच्या अनुयायांद्वारे मागील ३६ वर्षांपासून निरंतर अशीच रक्तदानाची शृंखला चालू असून त्यात आतापर्यंत ७३६२ रक्तदान शिबीर संपन्न झाली असून १२,१६,६४९ युनिट रक्त संकलन करण्यात आले आहे.
संत निरंकारी मिशन द्वारा मानवतेच्या कल्याणार्थ वेळो-वेळी संपूर्ण विश्वामध्ये अनेक जनसेवेचे उपक्रम आयोजीत करण्यात येतात, ज्यामध्ये मुख्यतः स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, निशुल्क आरोग्य तपासणी ,नेत्र चिकित्सा शिबीर तसेच महिला सशक्तीकरण, बाल-विकास, नैसर्गिक संकटांच्या वेळी सहायता यांसारख्या कल्याणकारी योजनांचे आयोजन केले जाते. यासारख्या सर्व सामाजिक कार्यासाठी भारत सरकार तसेच राज्य सरकारांद्वारे मिशनला वेळोवेळी सन्मानित करण्यात आले आहे.

संपादक साहेब धन्यवाद…