fbpx

पाकिस्तान जिंदाबाद च्या घोषणेची दखल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली – चंद्रकांत पाटील

पुणे:पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेकायदेशीर जमा जमा करून आंदोलन केले. NIA, ED या केंद्रीय तपास यंत्रणेने पीएसआय च्या राज्यस्तरीय नेत्यांना अटक केल्याच्या निषेधार्थ काल पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तान जिंदाबाद’ आणि ‘नारा ए तकबीर, अल्लाह हू अकबर’ची घोषणाबाजी केली. हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यावर पुण्यात पीएफआय वर एनआयएचे छापे पडल्यानंतर त्याच्या निषेधार्थ काढलेल्या मोर्चा मध्ये पाकिस्तान जिंदाबाद च्या घोषणा झाल्याच्या घटनेची गंभीर दखल उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकारांना माहिती दिली.
‘चंद्रकांत पाटील म्हणाले, या प्रकरणाचा तपास सुरू असून यावर बोलणे योग्य नसल्याचे सांगतानाच त्याची सखोल चौकशी होणार असल्याचंही ते म्हणाले. पुण्यासारख्या ठिकाणी दहशतवादी संघटनेला समर्थन करण्यासाठी मोर्चा निघते ही गोष्टच गंभीर असल्याचेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: