पुण्यात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीमारामन यांच्या स्वागत कमानीला काळे फसले
पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीमारामन या गेल्या २ दिवसांपासून पुणे दौऱ्यावर असून त्यांच्या स्वागतासाठी उभारण्यात आलेल्या कमानीवर काळे फासण्याचा प्रकार आज उघडकीस आला. धनकवडी येथील अहिल्यादेवी चौकात भाजपाच्या नेत्याचा काळे फासून अपमान केल्याने परिसरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
बारामती मतदासंघातील खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी व भाजपचा गड अधिक मजबूत करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना भाजपाने जबाबदारी दिली आहे.
सातारा रस्त्यावरील अहिल्यादेवी चौक येथील शिवछत्रपती सभागृहात खडकवास मतदार संघाच्या वतीने आमदार भीमराव तापकीर यांच्या कार्यक्रमाच्या निमित्त गुरुवारी स्वागतपर कमान लावण्यात आली होती. या प्लेक्स कमानीवर काही समाजकंटकांनी रात्रीतून काळे फासले. तसेच या गोष्टीचा निषेध करण्यात आला आहे. दरम्यान याबाबत पोलीस स्टेशनमध्ये कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही.