fbpx

कॉमेडीयन राजू श्रीवास्तव यांचे निधन

नवी दिल्ली : मागील दीड महिन्यांपासून (42 दिवस) एम्स रूग्णालयात उपचार घेत असणाऱ्या राजू श्रीवास्तव यांचे आज वयाच्या 59 व्या वर्षी निधन झाला आहे. 10 ऑगस्ट रोजी त्यांना दिल्ली येथील रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. वारंवार त्यांच्या प्रकृतीच्या नवीन अपडेट समोर येत होत्या. मागील काही दिवसांपूर्वी राजू यांची प्रकृती सुधारत असल्याचं सांगितलं जात होतं. परंतु त्यानंतर त्यांची प्रकृती पुन्हा खालावली असून आज दिल्लीतील एम्स रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला. हिंदी टेलिव्हिजन आणि चित्रपटसृष्टीत आपल्या विनोदाचा ठसा उमटवणाऱ्या विनोदवीराच्या जाण्याने अनेक कलाकार शोक व्यक्त करत आहेत.

राजू श्रीवास्तव यांना मागील अनेक दिवसांपासून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. डॉक्टरांकडून आणि कुटुंबियांकडून ते लवकर ठीक होणार असल्याचं माहिती दिली जात होती. डॉक्टरांनी सांगितलं होतं की, राजू श्रीवास्तव यांच्या डोक्यातील तीन नासांमधील एक नस ब्लॅक झाली आहे. ज्याच्या उपचारासाठी न्यूरोफिजियोथेरेपीची मदत घेतली जात होती.

राजू श्रीवास्तव हॉटेलच्या जिममध्ये वर्कआउट करत होते. ट्रेडमिलवर व्यायाम करत असताना त्यांना छातीत दुखू लागले आणि ते खाली कोसळले. यानंतर राजू श्रीवास्तव यांना त्यांच्या जिम ट्रेनरने तातडीने रुग्णालयात नेले. तेव्हापासून राजू दिल्लीच्या एम्समध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचा घेत आहेत. सर्वोत्कृष्ट डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहे आणि प्रत्येक क्षणी त्यांचे निरीक्षण करत आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: