Sunday, June 21, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

भाजपच्या मिशन बारामतीला आजपासून प्रारंभ

पुणे:राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात विजय मिळविण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या महत्त्वाकांक्षी ‘मिशन बारामती’ला आज पासून पुण्यात प्रारंभ होणार आहे.
त्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज पुण्यात येणार आहेत.
तीन दिवसीय दौऱ्यात २१ कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. परिवार सन्मान बैठक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक, संघटनात्मक तयारी आढावा, मंडल आणि जिल्हा पदाधिकाऱ्यांबरोबर बैठका, सुकाणू समिती पदाधिकारी बैठक, मोर्चा पदाधिकाऱ्यांबरोबर संवाद, भाजपच्या स्थानिक लोकप्रतिनिधींबरोबर चर्चा, सहकारी आणि व्यापारी संस्थांच्या प्रतिनिधींबरोबर बैठक, महिला मोर्चा आणि युवक पदाधिकाऱ्यांशी संवाद सीतारामन साधणार आहेत. शासकीय अधिकाऱ्यांबरोबर शनिवारी त्या आढावा बैठकही घेणार आहेत.
अनेक वर्षांपासून बारमतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा, पवार घराण्याचा दबदबा आहे. शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे इथे खासदार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत त्यानाच तगडं आव्हान देण्यासाठी भाजपने सर्वशक्ती पणाला लावली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading