रामदास कदमांची भाषा म्हणजे भाजपची स्क्रिप्ट – सुषमा अंधारे
पुणे : रामदास कदम यांनी आदित्य ठाकरेंसह ठाकरे कुटूंबईयासाठी वापरलेली वक्तव्य म्हणजे भाजपने दिलेली स्क्रिप्ट आहे, अशी टीका शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी आज केली. तसेच रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे व परिवारांविषयी वापरलेल्या वक्यव्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्यापासून राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याचेही अंधारे यांनी सांगितले.
सुषमा अंधारे म्हणाल्या, आदित्य ठाकरे यांच्या लग्नाबद्दल जी भाषा शिंदे गटांकडून वापरली जाते ती भाजपची स्क्रिप्ट आहे.
तुम्ही का आदित्य ठाकरेंना लग्न करायला सांगतायं, तुम्ही एखादी विवाह संस्था खोलली आहे? तुम्हाला त्यांच्या लग्नाचं काय करायचं आहे, त्यांचे आई-वडील बघून घेतील. हे सांगणारे तुम्ही कोण ? असा सवाल अंधारे उपस्थित केला.
कदम आज ज्या भाजपच्या मांडीवर जाऊन बसले आहेत. ते ही भाषा कोणत्यातरी दबावात बोलत आहेत, हे विचार करण्या सारखे आहे. रामदास कदमांची ही धडपड केवळ विधान परिषदेच्या जागेसाठी आहे, असा हल्लाबोल सुषमा अंधारे यांनी केला आहे.
.. नाहीतर परवानगी शिवाय शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर
शिवसेनेमध्ये दोन गट निर्माण झाल्यामुळे शिवतीर्थावर दसरा मेळावा कोणाचा होणार याबाबद अनेक वाद आहेत. मुंबई महापालिकेने सावध पवित्रा घेत निर्णय दोन दिवस पुढे ढकला आहे. मात्र पालिकेवर शिंदे गटाचा वाढता दबाव पाहता मिळाली तर परवानगीने नाहीतर परवानगी शिवाय शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर घेणारच याचा पुनरुचार शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी आज पुण्यात केला. दरम्यान, आमदार रवी राणा यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर घाणेरडे आरोप केले आहेत. यावर सुषमा अंधारे म्हणाल्या,अमरावतीच्या ताईंचं संतुलन ढासळलंय नाव न घेता नवनीत राणा यांच्यावर सुषमा अंधारे यांनी टीका केली आहे.
