पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या अडचणी बाबत तातडीने नोडल ऑफिसरची नेमणूक करा – चंद्रकांत पाटील
पुणे : आज पुणे विद्यापीठात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व युवक क्रांती दल यांच्या वतीने परीक्षा विभागाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. मात्र यावेळी प्र कुलगुरू किंवा कोणताही संबंधीत अधिकारी या आंदोलकांना भेटण्यास आला नाही. याची माहिती मिळताच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या आंदोलनाची तातडीने दखल घेतली व पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या अडचणी बाबत तातडीने नोडल ऑफिसरची नेमणूक करा, असे आदेश दिले आहेत.
आंदोलनाच्या वेळी विद्यापीठ प्रशासनाकडून अपेक्षीत प्रतिसाद न मिळाल्याने विद्यार्थी आक्रमक झाले होते. ही माहिती चंद्रकांत पाटील यांना कळताच त्यांनी पुणे विद्यापीठाचे कुलसचिव प्रफुल्ल पवार यांच्याशी दूरध्वनी वरून संपर्क केला आणि पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या अडचणी बाबत तातडीने नोडल ऑफिसरची नेमणूक करावी असे निर्देश दिले.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांच्या अडचणी काय आहेत त्या वेळेतच विद्यापीठ प्रशासनाने सोडवल्या पाहिजे. यासाठी तातडीने नोडल ऑफिसर नियुक्त करावा त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अडचणी वेळेत सुटतील, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाची उच्च व तंत्र शिक्षणमंत्री @ChDadaPatil यांनी तातडीने दखल घेतली.विद्यापीठाचे कुलसचिव प्रफुल्ल पवार यांच्याशी संपर्क साधून विद्यार्थ्यांच्या अडचणींबाबत नोडल अधिकाऱ्याची त्वरित नेमणूक करण्याचे निर्देश त्यांंनी दिले pic.twitter.com/aw5T2aPC9l
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) September 20, 2022
