Sunday, June 21, 2026
BusinessLatest News

गोदरेज अप्लायन्सेसतर्फे नवी प्रीमियम उत्पादने लाँच

मुंबई : गोदरेज अप्लायन्सेस या गोदरेज अँड बॉइसची प्रमुख कंपनी गोदरेज समूहाचे व्यावसायिक युनिटने सणासुदीच्या दिवसांत ग्राहकांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी दिल बोले वॉव हे नवे कॅम्पेन तयार केले असून त्यात सणांच्या निमित्ताने खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी १०० पेक्षा जास्त नव्या मॉडेल्सचा तसेच विविध ऑफर्सचा समावेश असेल.

विविध विभागांमध्ये प्रीमियम उत्पादनांना मागणीचा ट्रेंड वाढत असल्याचे लक्षात घेत कंपनीने इयॉन वेलवेट श्रेणी तयार केली आहे, ज्यात आधुनिक वैशिष्ट्ये असलेले साइड-बाय-साइड रेफ्रिजरेटर्स आणि जर्मशील्ड तंत्रज्ञान, आधुनिक स्वरूप आणि बॅक पॅनेल कंट्रोल्स असलेली टॉप लोड वॉशिंग मशिन्स आणि इयॉन क्रिस्टल सीरीज – खाद्यपदार्थांना पृष्ठभागामुळे होणाऱ्या संसर्गापासून वाचवणारे नॅनो शील्ड तंत्रज्ञान असलेले ग्लास डोअर फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटर्स, सेमी- ऑटोमॅटिक वॉशिंग मशिन्सची नवी श्रेणी, डीप फ्रीझर्स यांचा समावेश आहे. त्याशिवाय ब्रँडने यावर्षी देशांतर्गत तयार करण्यात आलेली स्मार्ट एसीचा समावेश असलेली एसीची श्रेणी, काउंटर टॉप डिशवॉसर्स, ग्लास डोअर सिंगल डोअर रेफ्रिजरेटर्स उपलब्ध केले आहेत. त्याशिवाय कंपनीने गोदरेज इन्सुलीकुल ही आटोपशीर व पोर्टेबल इन्सुलीन कुलरची श्रेणी लाँच केली आहे, ज्यामध्ये इन्सुलीनचा प्रभावीपणा २ ते ८ अंश सेल्सियसला राखला जातो.

या नव्या ऑफर्सविषयी गोदरेज अप्लायन्सेसचे, गोदरेज अँड बॉइसचा भाग, व्यवसाय प्रमुख आणि कार्यकारी उपाध्यक्ष कमल नंदीम्हणाले, ‘गेल्या वर्षीच्या सणासुदीच्या हंगामापासून यंदा ऑक्टोबरपर्यंत आम्ही १०० पेक्षा जास्त नवी उत्पादने एसकेयूज लाँच करत ग्राहकांना भरपूर निवड मिळवून दिली आहे. ही नवी श्रेणी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रीमियम उत्पादनांवर केंद्रित असून त्यात साइड बाय साइड रेफ्रिजरेटर्सपासून टॉप एंड ऑटोमॅटिक वॉशिंग मशिन्स, डबल डोअर रेफ्रिजरेटर्स, आधुनिक एसी यांचा समावेश आहे. यातील बहुतांश प्रीमियम उत्पादने आरोग्याला प्राधान्य देणारी असून त्यांच्यासाठी पेटंट अर्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यात रेफ्रिजरेटर्समधील फूड डिसइनफेक्शन तंत्रज्ञान, वॉशिंग मशिन्स जर्म डिसइनफेक्शन किंवा इन्सुलीनसाठी थर्मोइलेक्ट्रिक प्रीसिजन कुलिंग यांचा समावेश असून त्यामुळे ग्राहकांचे आरोग्य राखण्यास मदत होते. या उत्पादनांना ग्राहक योजनांची जोड देण्यात आली आहे व त्यामुळे येत्या सणासुदीच्या दिवसांत एकत्रितपणे ५० टक्क्यांची वाढ होईल असा अंदाज आहे.’

ग्राहक योजनांअंतर्गत ग्राहकांना विस्तारित वॉरंटी, एक्सचेंज, आघाडीच्या बँकांच्या मदतीने १२००० रुपयांपर्यंत कॅशबॅक दिला जाणार आहे. ग्राहकांना केवळ एक रुपयाचे डाउन पेमेंट करून गोदरेज अप्लायन्सेस घरी नेता येणार आहेत. ईएमआयचे सोयीस्कर पर्याय उपलब्ध करून दिले जातील. या योजना पॅन भारतातील १८,००० पेक्षा जास्त दुकानांमध्ये १०० पेक्षा जास्त उत्पादनांवर उपलब्ध केल्या जातील. गोदरेज अँड बॉयसचे १२५ वर्षांचे सेलिब्रेशन सुरू असल्यामुळे प्रत्येक ग्राहकाला नोंदणी केल्यावर एक लाख रुपये जिंकण्याची संधी मिळेल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading