शिंदे – फडणवीस सरकार हे स्वार्थी ED सरकार आहे – खासदार सुप्रिया सुळे
पुणे : पुण्यातील नऱ्हे भागात पाणीपुरवठा हा सुरळीत नाही.नऱ्हे भागातील विविध रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या महापालिकेच्या दिसाळ कारभाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे आंदोलन करण्यात आले.
हे आंदोलन राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात करण्यात आले.
या आंदोलनाला .नऱ्हे भागातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुप्रिया सुळे म्हणाल्या,पुण्यातील नऱ्हे भागात पाणीपुरवठा हा सुरळीत नाही.नऱ्हे भागातील विविध रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या महापालिकेच्या दिसाळ कारभाराविरोधात आम्ही आंदोलन करत आहोत.
सत्तेसाठी किती तडजोड करावी याचे उत्तम उदाहरण सध्याचे सरकार आहे. सत्ता टिकली पाहिजे, हे त्यांचे धोरण आहे. सत्ता टिकावी यासाठी तडजोड करणे सुरु आहे. राज्यातील जनता वाऱ्यावर सोडल्या जाते. राज्यातील जनतेचे नुकसान होत आहे. सध्याचे स्वार्थी ईडी सरकार आहे.असा आरोप सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर केला.
राष्ट्रवादी पक्ष हा संविधान मानणारा आहे. तर भाजपचे अध्यक्ष म्हणतात की, एक देश एक पक्ष आहे. ही एक हुकूमशाहीच म्हणावी लागेल. ही देशातील दडपशाही आहे. जनता हे पाहत असल्याचेही सुप्रिया सुळे सांगायला विसरल्या नाहीत.
आता गणपती आहेत. त्यानंतर अनेक सण आणि काहीनाकाही होत राहील. त्यामुळे महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्र्यांची गरज आहे. एक या कार्यक्रमाला जातील आणि दुसरे मंत्रालयात बसून माय-बाप जनतेची सेवा करतील असा निरोप आम्हाला कोणीतरी WhatsApp वर पाठवला आहे. असं म्हटलं होतं. तसेच सुप्रिया सुळे यांनी .महाराष्ट्रातलं सरकार ओरबाडून, दडपशाही करून, ईडी करून चुकीच्या पद्धतीने सत्तेत आलं आहे. आजकाल ५० खोके, एकदम ओके हे ऐकायला मिळत.हे खूप दुर्दैवी आहे. अडीच महिने झाले आपल्या जिल्हात आणि कुठेही राज्यात पालकमंत्रीच नाही. मी गेले 15 दिवस नव्या मंत्र्यांची कामासाठी वेळ मागतेय पण मला अजूनही वेळ मिळालेली नाही.असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
