कृषीफाय ॲप सादर करत आहे शेतकऱ्यांसाठी व्हॉइस सर्च फीचर
पुणे : कृषीफाय हे भारतातील शेतकऱ्यांसाठीचे एकमेव सोशल नेटवर्क आणि कॉमर्स प्लॉटफॉर्म आहे , ज्याने ९ दशलक्ष शेतकरी तसेच शेकडो व्यवसायांना जोडून कृषी क्षेत्रातील सर्वात मोठे डिजिटल नेटवर्क तयार केले आहे. यात एसएमई, रिटेलर विक्रेते, वितरक इ.चे नेटवर्क आहे, ज्यापैकी ७.५ लाखाहून अधिक वापरकर्ते महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील आहेत. ग्रुप एम (GroupM) च्या अहवालानुसार, भारतात व्हॉइस सर्चमध्ये २७०% वाढ झाली आहे. हे लक्षात घेऊन कृषी ॲपने शेतकर्यांना त्यांच्या सोशल नेटवर्कवर त्यांच्या आवडीचे विषय सहज शोधता यावेत यासाठी व्हॉईस सर्च फीचर देखील सुरू केले आहे.
थोडक्यात सांगायचे तर, कृषीफाय ॲप वरील व्हॉईस सर्च फिचर शेतकऱ्यांना कोणत्याही भाषिक किंवा संवादाच्या अडथळ्यावर मात करण्यास मदत करेल आणि त्यांच्या आवाजाद्वारे कोणतीही माहिती शोधणे सोपे करेल. व्हॉईस सर्च हे एक अॅड-ऑन वैशिष्ट्य आहे जे वापरकर्त्याचा कृषीफायच्या सोशल नेटवर्कवरील प्रवास सुलभ करेल ज्यामुळे त्यांना बाजारभाव, सरकारी योजना, पशुसंवर्धन, शेती इत्यादी शेतकऱ्यांशी संबंधित कोणताही विषय शोधण्यात मदत होईल. शेतकरी याच्या मदतीने पीक संरक्षण, धान्य उत्पादन, ट्रॅक्टर, उपकरणे, यंत्रसामग्री इत्यादी माहितीशी संबंधित कोणतीही शंका विचारू शकतात.
कृषीफायचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर अविनाश कुमार म्हणाले, “बदलत्या वेळेसोबतत ग्राहकही आवाजाच्या नव्या युगाकडे जात आहेत. लोकांना टाईप किंवा क्लिक करण्यापेक्षा बोलणे अधिक सोपे वाटते. शिवाय, आमच्या डेटावरून असे दिसून येते की ग्रामीण भारतात व्हॉइस सर्चची उपयुक्तता खूप जास्त आहे.” कृषीफायचे चीफ टेक्नॉलजी ऑफिसर मनीष अग्रवाल म्हणाले, “आम्ही आमच्या ॲपचा वापर शेतकऱ्यांसाठी व्हॉइस सर्च लाँच करण्यासाठी केला, त्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळाली. आम्हाला वाटते की व्हॉइस कमांड्स चांगल्या कम्युनिकेशनसाठी आवश्यक आहेत. आमच्या प्लॅटफॉर्मवरील ५४% शेतकरी कमेंट टाइप करण्यापेक्षा कमेंट सेक्शन मध्ये स्पीच टू टेक्स्ट ट्रांसक्रिप्शनचा उपयोग करत आहेत. यामुळे आम्हाला डेटा सेंट्रीक निर्णय घेण्यात आणि या नवीन सुविधांना लॉन्च करण्यासाठी मार्गदर्शन केले.
