Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

मोदीजींच्या कार्याची उंची प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या साधकांनी उत्तम ओळखली – चंद्रकांत पाटील

पुणे : माननीय मोदीजींच्या कार्याची उंची प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या साधकांनी उत्तम प्रकारे ओळखली, अशी भावना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज व्यक्त केली. तसेच मोदीजींनी देशाची एकात्मता टिकवण्यासाठी अतिशय मोठं कार्य केलं, असेही प्रतिपादन पाटील यांनी यावेळी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय बाणेर, पुणे यांच्या वतीने 60 फूट उंच व 44 फूट रुंद सर्वात मोठे ग्रीटिंग कार्ड उभारुन अतिशय अभिनव पद्धतीने शुभेच्छा दिल्या. या ग्रिटींग कार्डचे उद्घाटन नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते झाले. यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी प्रजापिता ब्रह्मकुमारीचे बी.के.डॉ त्रिवेणी, बी.के.डॉ गंगाधर भाई, डॉ.दीपक हरके, विकास गुजर,भाजपा पुणे शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे, शहर उपाध्यक्ष गणेश कळमकर, नगरसेविका ज्योती कळमकर, नगरसेवक अमोल बालवडकर, भाजपचे पुनित जोशी, लहू बालवडकर आदी मान्यवर देखील उपस्थित होते.

नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, माननीय मोदीजींचे कार्य इतके मोठे आहे, त्याची उंची शब्दात व्यक्त करणे अतिशय कठीण आहे. रशिया आणि युक्रेनदरम्यान तणाव निर्माण झाल्यानंतर दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित होण्यासाठी संपूर्ण जगाने माननीय मोदीजींकडेच पुढाकार घेण्याचे आवाहन केले. माननीय मोदीजींच्या कार्याची उंची इतकी मोठी आहे, ती प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या साधकांनी उत्तम प्रकारे ओळखली.

ते पुढे म्हणाले की, माननीय मोदीजींच्या नेतृत्वात देश अतिशय झपाट्याने विकास करत आहे. कोणत्याही प्रश्नांना शिल्लक न ठेवण्यासाठीची त्यांची धडपड सुरू आहे. यासाठी प्रचंड साधना केली. त्यातूनच त्यांना जी ऊर्जा मिळत, त्यातून ते आज मोठ मोठ्या आव्हानांवर सहज मात करत आहेत, असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.

यावेळी भाजपाचे संघटन सरचिटणीस राजेश पांडे, ओम शांतीचे बी. के.‌गंगाधर भाई यांनी ही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक डॉ. दिपक हरके यांनी केले. आभार डॉ. बी. के. त्रिवेणी यांनी मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading