fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsPUNE

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त बोपोडीत स्वच्छता मोहीम

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस भाजपा मार्फत आज विविध सामाजिक उपक्रमातून साजरा केला जात आहे. मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त आज शहरात स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले होते. या मोहिमे अंतर्गत औंध रोड, बोपोडी, पुणे विद्यापीठ या भागात भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने यांच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
पुणे महापालिकेचे स्वच्छतादूत चंद्रकांत साठे, त्यांचे सर्व सहकारी तसेच प्रभाग आठचे अध्यक्ष गणेश स्वामी, शिवाजीनगर युवा मोर्चा सरचिटणीस रोहित भिसे, ताराचंद ढोबळे, सुनील दैठणकर, योगेश केरकर, नितीन गायकवाड (एच.एम), अरुण बागडी, संतोष भिसे, संदीप चौरे, जितेंद्र गायकवाड, हिमांशू मुथय्या, अनिल माने,प्रतिक वाघमारे आदी मान्यवर या मोहिमेत सहभागी झाले होते.

याबाबत माहिती देताना सुनील माने म्हणाले, भारतीय जनता पक्षामध्ये लोकोपयोगी आणि विधायक कामातून नेत्यांचा वाढदिवस साजरा करण्याची परंपरा आहे. म्हणूनच मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त इतर खर्चाला फाटा देत आज शहरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. गांधीजींचे ‘स्वच्छ व निरोगी’ भारताचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी स्वच्छतेची देशव्यापी चळवळ व्हावी असे आवाहन मोदिजींनी देशवासियांना केले होते. त्यांनी स्वत: हातात झाडू घेऊन गांधीजींच्या जयंती निमित्त या मोहिमेची सुरुवात केली होती. म्हणूनच आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही स्वच्छता मोहीम राबवली. रस्त्यावर लोकांनी घाण करु नये व इतरांनाही त्यापासून परावृत्त करावे, असे आवाहन मोदींनी केले होते. जनतेला पंतप्रधानांनी “ ना गंदगी करेंगे, ना करने देंगे” चा मंत्र दिला. लोकांच्या प्रतिसादामुळे आज स्वच्छ भारत अभियानला जनचळवळीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. यातूनच प्रेरणा घेत आम्ही आज भाऊ पाटील रोड आंबेडकर चौक, औंध रोड पाटील कॉम्प्लेक्स परिसर तसेच पुणे विद्यापीठ आयुका गेट येथे स्वच्छता मोहीम आयोजित केली होती.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading