Wednesday, June 17, 2026
Latest NewsSports

पहिल्या पीसीबीएसएल स्पर्धेत द व्हर्लविंड्स, रॉकेट्स, बॉल ब्रेकर्स संघांची विजयी सलामी 

पुणे : पहिल्या पीसीबीएसएल(पुना क्लब बिलियर्ड्स अँड स्नूकर लीग) स्पर्धेत साखळी फेरीत  द व्हर्लविंड्स, रॉकेट्स, बॉल ब्रेकर्स या संघानी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी सलामी दिली. 
 
पुना क्लब स्नूकर हॉल येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत पहिल्या सामन्यात विघ्नेश सांघवी, साहिल हांडा, रोहित चोप्रा, निशांत मेहता यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर द व्हर्लविंड्स संघाने आरएस कॅनन्स संघाचा 3-2 असा संघर्षपूर्ण पराभव करून शानदार सुरुवात केली. दुसऱ्या सामन्यात उदित सांघवी, विशाल आस्वानी, कपिल पंजाबी, राहूल बाग्गा, वैभव शहा यांच्या सुरेख कामगिरीच्या जोरावर रॉकेट्स संघाने सांघवी शुटर्सचा 4-1 असा पराभव करून विजयी सलामी दिली. 
 
अन्य लढतीत बॉल ब्रेकर्स संघाने परमार ऑल स्टार्स संघावर 3-2 असा विजय मिळवला. विजयी संघाकडून संजय जाधव, अदित्य शेट्टी, प्रशांत राजगोरे, अंगद सहानी यांनी अफलातून कामगिरी केली. याआधी स्पर्धेचे उदघाटन महाराष्ट्र बिलियर्ड्स अँड स्नूकर संघटनेचे अध्यक्ष राजन खिंवसरा, पुना क्लब लिमिटेडचे अध्यक्ष नितीन देसाई,   पुना क्लब लिमिटेडचे उपाध्यक्ष सुनील हांडा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा विघ्नेश सांघवी, कपिल पंजाबी, सुरज राठी, संजय सांघवी, मुकेश सांघवी, स्पर्धा संचालक रणजीत पांडे आदी मान्यवर उपस्थित होते.   
 
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
द व्हर्लविंड्स वि.वि आरएस कॅनन्स 3-2(15 रेड हॅंडीकॅप स्नूकर एकेरी: विघ्नेश सांघवी वि.वि राजेश जंदियाल  100-70; दुहेरी:साहिल हांडा/रोहित चोप्रा वि.वि मिनु करकारिया/रिकी राजपाल 106-79; हॅंडीकॅप बिलियर्ड्स एकेरी:  सुनिल हांडा पराभूत वि आनंद केरिंग 180-200; 6 रेड  हॅंडीकॅप स्नूकर एकेरी (3 फ्रेममधील सर्वोत्कृष्ट): निशांत मेहता वि.वि मुनिझ पुनावाला 29-51, 44-36, 63-24; ब्लू शूटआउट: निरज अरोरा पराभूत वि अनिश केरिंग 1-3);

 
रॉकेट्स वि.वि सांघवी शुटर्स 4-1(15  रेड हॅंडीकॅप स्नूकर एकेरी : विशाल अरोरा पराभूत  वि.गिरिश दामले 70-74; दुहेरी: उदित सांघवी/विशाल आस्वानी वि.वि शाम राठी/रणजीत पांडे 116-102;  हॅंडीकॅप बिलियर्ड्स एकेरी:कपिल पंजाबी वि.वि राजू खांडके 200-181;  6 रेड  हॅंडीकॅप स्नूकर एकेरी (3 फ्रेममधील):राहूल बाग्गा वि.वि धीरज कोचर  55-46, 53-27;  ब्लू शूटआउट:वैभव शहा वि.वि अशरफ परवानी 1-0); 
 
बॉल ब्रेकर्स वि.वि.परमार ऑल स्टार्स 3-2( 15  रेड हॅंडीकॅप स्नूकर एकेरी : विनोद मखिजा पराभूत वि नविन कोचर  72-126; दुहेरी: संजय जाधव/अदित्य शेट्टी वि.वि शबिराम आर/दशमेश कालरा 120-72;  हॅंडीकॅप बिलियर्ड्स एकेरी : आर.के शर्मा पराभूत वि संजय दिडी 136-200;  6 रेड  हॅंडिकॅप स्नूकर एकेरी (3 फ्रेममधील):प्रशांत राजगोरे वि.वि सिध्दार्थ मोडे 65-28,45-26;  ब्लू शूटआउट : अंगद सहानी वि.वि सनत परमार 3-1).

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading