Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचा पुणेकरांतर्फे सन्मान


पुण्याचा गणेशोत्सव यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल अभिनंदन ; आम्ही पुणेकर, परिवर्तन संस्था आणि तर्फे आयोजन

पुणे :- आम्ही पुणेकर, परिवर्तन संस्था आणि शारदा ज्ञानपीठ यांच्या वतीने पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव हा यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचा पोलीस मुख्यालयात जाऊन विशेष सन्मान करण्यात आला.

यावेळी पंडित वसंतराव गाडगीळ , परिवर्तन चे अध्यक्ष डॉ. शैलेश गुजर, आम्ही पुणेकर चे हेमंत जाधव, अभयराज शिरोळे, ॲड. दिलीप हांडे आदी उपस्थित होते. पंडित वसंतराव गाडगीळ यांच्या हस्ते व त्यांनी तयार केलेल्या मानपत्राद्वारे शाल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

आदर्श पोलीस व्यवस्थापनाने सर्व पुणेकरांना गणेशोत्सवाचा आनंद दोन वर्षाच्या कालखंडानंतर घेता आला, त्याबद्दल आनंद व्यक्त करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना अमिताभ गुप्ता म्हणाले, गणरायाचा आशिर्वाद, पुणेकर नागरिकांनी आम्हाला केलेले सहकार्य आणि कायदा सुव्यवस्था राखण्यास झालेली सर्वांची मदत यामुळे उत्सव यशस्वीपणे पार पाडता आला. गणेश मंडळे, कार्यकर्ते, आमदार, खासदार, मंत्री, सर्व राजकीय पक्ष यांनी सहकार्य केल्यामुळे पुण्याचा गणेशोत्सव शांततेत पार पडू शकला. पुणेकरांचेही व माझ्या पोलीस दलातील सर्व सहकार्याचे मी आभार मानतो, असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading