Wednesday, June 17, 2026
Latest NewsMAHARASHTRA

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयात सेवा सप्ताहाचे आयोजन

नाशिक – महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयात दि. 17 ते 23 सप्टेंबर 2022 दरम्यान सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून व वैद्यकीय शिक्षण, ग्रामविकास आणि पंचायती राज, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री तथा विद्यापीठाचे मा. प्र-कुलपती नामदार श्री. गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयांमध्ये सेवा सप्ताहाचे आयोजन करणेबाबत निर्देशित करण्यात आले आहे. या सेवा सप्ताहात दि. 17 सप्टेंबर 2022 रोजी रक्तदान शिबीर व अवयवदान विषयी जनजागृती, दि. 18 सप्टेंबर रोजी वृक्षारोपण, प्रदुषण रोखण्यासाठी जनजागृती, दि. 19 सप्टेंबर रोजी योगाभ्यास व फिट इंडिया अभियान, दि. 20 सप्टेंबर रोजी स्वच्छता जनजागृती अभियान, दि. 21 सप्टेंबर रोजी देशसेवा विषयक निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धांचे आयोजन, दि. 22 सप्टेंबर रोजी वृध्दाश्रम, अनाथाश्रम, गरीबवस्ती येथे विनामूल्य रुग्ण तपासणी व उपचार शिबीरांचे आयोजन करणे व दि. 23 सप्टेंबर रोजी उपक्रमाचा समारोप आदी उपक्रम करण्यात येणार आहेत.
विद्यापीठाच्या संलग्नित महाविद्यालयाचे अधिष्ठाता, प्राचार्य व महाविद्यालय प्रमुख यांनी सेवा सप्ताहाचे आयोजन करावे असे निर्देश देण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading