Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

जातीवादी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे वेदांत फॉक्सवॕन प्रकल्प गुजरातला गेला – संभाजी ब्रिगेड

पुणे : फॉक्सकॉन – वेदांताचा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. ह्या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक १ लाख ५८ हजार कोटींची आहे, हा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव येथे होणार होता, प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता, असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेलाच कसा? बेरोजगारी वाढत असताना असे महत्वाचे प्रकल्प गुजरात राज्यात जातायत हे जाणीवपूर्वक होतंय याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत, वेदांताचा प्रकल्प महाराष्ट्रात परत आला पाहिजे. अन्यथा संभाजी ब्रिगेड च्या वतीने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात तीव्र आंदोन करण्यात येईल, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अॅड. मनोज आखरे यांनी दिला.  

फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रात १.५८ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार होता. महाविकास आघाडी सरकारने या प्रकल्पावर जवळपास ९० टक्के चर्चाही केली होती. पण सरकार बदलताच हा प्रकल्प गुजरात राज्यात गेला, याचे नेमके गौडबंगाल काय हे जनतेला कळाले पाहिजे. या प्रकल्पातून १ लाख रोजगार निर्माण होणार होते. एवढा मोठा प्रकल्प गुजरातला गेल्याने महाराष्ट्रातील तरुणांनी काय फक्त दहिहंड्याच फोडत बसायचे काय? असा प्रश्न राज्यसरकारला संभाजी ब्रिगेड चे अध्यक्ष ऍड मनोजदादा आखरे यांनी केला, संभाजी ब्रिगेड पुणे शहर व जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे अध्यक्ष मनोज  आखरे, यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यसरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले, यावेळी बोलताना ऍड मनोज आखरे यांनी राज्यसरकार धारेवर धरलं,

महाराष्ट्र हे गुंतवणुकदारांच्या पसंदीचे पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. परंतु मविआचे सरकार जाताच अडीच महिन्यात असे काय झाले की फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला. हा प्रकल्प गुजरातमध्ये जात असल्याची कोणतीच माहिती राज्य सरकारला समजली नाही का? हा प्रकल्प महाराष्ट्रातच रहावा यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने काय प्रयत्न केले?
मुंबई व महाराष्ट्राचे महत्व कमी करण्यासाठी भारतीय जनता पक्ष व केंद्रातील भाजपा सरकार सातत्याने प्रयत्न करत आले आहे. फडणवीस सरकार राज्यात असताना मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्रही गुजरातला हलवण्यात आले. अनेक महत्वाचे प्रकल्प व कार्यालयेही गुजरातला हलवण्यात आली. बुलेट ट्रेनची गरज नसतानाही महाराष्ट्राच्या माथी हा प्रकल्प लादला गेला. आता पुन्हा महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला जात आहेत याचे गांभीर्य या सरकारला नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्कार सोहळे करण्यात व देवदर्शनात व्यस्त आहेत. त्यातून त्यांना राज्य कारभार करण्यास वेळ मिळत नसावा पण थोडे लक्ष राज्याच्या कामकाजात दिले असते तर एवढा मोठा प्रकल्प महाराष्ट्राच्या हातून गेला नसता. आता गुंतवणूकही गेली आणि लाखो रोजगारही गेले. हे का झाले याचा खुलासा महाराष्ट्र सरकारने केला पाहिजे, फॉक्सकॉन – वेदांताचा सेमीकंडक्टर बनवण्याचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. ह्या प्रकल्पाची एकूण गुंतवणूक १ लाख ५८ हजार कोटींची आहे, हा प्रकल्प पुण्याजवळ तळेगाव येथे होणार होता, प्रचंड रोजगारनिर्मितीची क्षमता, असणारा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेलाच कसा? बेरोजगारी वाढत असताना असे महत्वाचे प्रकल्प गुजरात राज्यात जातायत हे जाणीवपूर्वक होतंय याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत, वेदांताचा प्रकल्प महाराष्ट्रात परत आलाच पाहिजे. अन्यथा राज्यसरकारला याची खुप मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला,

यावेळी प्रदेश संघटक संतोष शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष अभिमन्यू पवार, सह संघटक मनोज गायकवाड, पुणे महानगरध्यक्ष अविनाश मोहिते, उत्तर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, मध्य जिल्हाध्यक्ष उत्तम कामठे, जिल्हा उपाध्यक्ष महादेव मातेरे,
पर्वती विधानसभा विभाग अध्यक्ष अविनाश घोडके, व्येकंटशभाऊ मानंपिडी, समाधान घोडके, रंजीत लंगर, वैभव घोडके, महानगर अध्यक्ष प्रवीण कदम, मावळ तालुकाध्यक्ष उमेश मांढरे, तेजस्विनी पवार, निलेश ढगे, संदीप कारेकर, साजिद सय्यद, सुरेखा जुजगर, जोतिबा नरवडे, रेखा कामठे, सिद्धार्थ कोंढाळकर, आरती भुजबळ, विवेक तुपे, रणजित बिराजदार, जयदीप रणदिवे, अशोक फाजगे, सोनु शेलार, किरण लोंढे, दिनकर केदारी, सनी थोपटे, हनुमंत गुरव, अंकुश हाके, संतोष सुर्यवंशी, अनिकेत भोसले, नवनाथ सुरवते, यांच्यासह संभाजी ब्रिगेड चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading