fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

आताचे मुख्यमंत्री गतिमान आहेत; आधीचे नव्हते – कृषिमंत्री अब्दुल सत्तार

पुणे : फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला आहे आणि आता तो काही परत येईल अशी शक्यता नाही. त्यामुळे या चर्चा आता बंद करुन नवीन काय करता येईल ते पाहायला हवं. खरंतर आधीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सक्षम नेतृत्वामुळे महाराष्ट्राला गुंतवणूक मिळायची. असे वक्तव्य शरद पवार यांनी केले आहे . त्यावर
शरद पवारांनी दोन्ही माजी मंत्री यांची तुलना केली. आहे.बरं झालं आताचे मुख्यमंत्री गतिमान आहे. आधीचे नव्हते मुख्यमंत्री नव्हते .मी त्या सरकारमध्ये राज्यमंत्री होतो. अशी टीका कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी पत्रकारांशी बोलताना शरद पवार यांच्यावर केली आहे.

अब्दुल सत्तार हे आज पुणे दौऱ्यावर आहेत तेव्हा त्यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या घरी भेट घेतली तेव्हा त्यांनी प्रथम माध्यमांशी संवाद साधला.
वेदांत प्रकल्प हा शिंदे व फडणीस सरकार मुळे महाराष्ट्राच्या बाहेर गेला असा आरोप महाविकास आघाडी मधील नेते करत आहेत त्यावर अब्दुल सत्तार म्हणाले,वेदांता प्रकल्पासाठी मागच्या अडीच वर्षात काय प्रयन्त झालेत ते बघायला पाहिजे, या दोन महिन्यात प्रकल्प गेला नाहीय. असे अब्दुल सत्तार म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रात सहा महिन्यात नवीन उद्योगधंदे आणणार असे आश्वासन दिले आहे त्यावर अब्दुल सत्तार म्हणाले,पंतप्रधानांनी शब्द दिला त्यावर विश्वास ठेवला पाहिजे, म्हणजे येत्या 6 महिन्यात या राज्यात नवीन उद्योग धंदे येणार. असे अब्दुल सत्तार म्हणाले.
अब्दुल सत्तार यांच्या जावयाने चुकीच्या पद्धतीने कॉन्टॅक्ट घेऊन त्यांच्या मतदारसंघात काम केले असा आरोप विरोधक करत आहेत. त्यावर अब्दुल सत्तार म्हणाले,कुणाचा जावई काम करत असेल काँट्रॅक घेत असेल तर त्याची काय चूक आहे, म्हणजे त्यांनी काम।करायचं नाही का ? बेकायदेशीर केलं आहे का? जावई कुणाचाही असो मात्र काम क्वालिटीचं झालं पाहिजे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नुसते बाहेरच्या दोऱ्यावर जात आहेत व त्यांचे राज्यात लक्ष नाही. असे विरोधक म्हणत आहेत त्यावर अब्दुल सत्तार म्हणाले,देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे लोकांचे काम करत आहेत म्हणून काही लोकांच्या पोटात पोटशूळ उठतय. असे अब्दुल सत्तार म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading