Friday, September 11, 2026
Latest NewsPUNE

उपेक्षित, वंचितांचा विकास राष्ट्रभाषेतूनच होऊ शकतो- डॉ.आर.एस.सर्राजु

पुणे : जागतिक आणि विविध क्षेत्रातील ज्ञान राष्ट्रभाषेतून दिले तर उपेक्षित आणि वंचित समाजाचा विकास झाल्याशिवाय रहाणार नाही असे मत हैद्राबाद विद्यापीठाचे प्र.कुलगुरू आर.एस.सर्राजु यांनी व्यक्त केले .  हिंदी दिनानिमित्त सावित्रीबाई फुले विद्यापीठात त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते त्यावेळी ते बोलत होते .
पुढे ते म्हणाले की ,जगभरात इंगजी भाषा पेक्षा त्या त्या भाषा जास्त प्रमाणात बोलल्या जातात आपल्याकडे मात्र राष्ट्रभाषे पेक्षा इंग्रजी भाषा मोठ्या प्रमाणात वावर होताना दिसून येतो .संस्कृती आणि इतिहास जोपासण्यासाठी राष्ट्रभाषेतूनच शिक्षण दिले जावे असे ही ते बोलले.
या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमी मुंबई ,हिंदी विभाग सावित्रीबाई पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता .यावेळी हिंदी भाषा ,साहित्य आणि सांस्कृतिक विश्वात विशेष कार्य केलेल्या मान्यवर यांना सन्मानित करण्यात आले होते .यामध्ये अशोक कामत,उमाशंकर उपाध्याय ,विठ्ठल भालेराव तुकाराम पाटील यांना सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक व हिंदी विभाग प्रमुख विजयकुमार रोडे यांनी केले तर सूत्रसंचलन राजेंद्र धोडे केले .
या कार्यक्रमास पुणे विद्यापीठाचे कुलसचिव प्रफुल्ल पवार , मानव्य विद्या विभागाचे अधिष्ठाता डॉ.विजय खरे ,संजय भारद्वाज ,विजयकुमार रोडे, घोड़े प्रो महेश जेवकर , प्रो विद्यागौरी टिलक, प्रो प्रवीण भोले, प्रो शशिकला राय, डा महेश दवंगे यासह अनेक मान्यवर उपस्थित होते .

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading