Sunday, June 21, 2026
Latest NewsPUNE

शिक्षक हे राष्ट्राचे शिल्पकार – डॉ. आशुतोष रारावीकर

‘निरंतर 19 वर्ष चालू असलेला शिक्षक दिन गौरव सोहळा’

पुणे : गुरु हे जीवनाच्या ध्येयप्राप्तीसाठी दिशा देणारे दीपस्तंभ असून ते राष्ट्रमूर्तीचे शिल्पकार असतात, असे भावपूर्ण उद्गार सुप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ व साहित्यिक डॉ. आशुतोष रारावीकर यांनी काढले.

लायन्स क्लबतर्फे आयोजित शिक्षक सन्मान सोहळ्याचे प्रमुख अतिथि म्हणून ते बोलत होते. कर्तृत्वसंपन्न अशा शिक्षकांचा सन्मान त्यांच्या हस्ते करण्यात आला.

व्यासपीठावर आयाेजक व लायन्स क्लबचे प्रमुख प्रकाश नारके, सतीश राजहंस, दिलीप निकम, राजेंद्र गोयल, विलास काळे, विलास मुळे, परमानंद शर्मा, सुनील चेकर आदी मान्यवर उपस्थित हाेते. यावेळी शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणा-या ३४ शिक्षकांचा मानपत्र देउन गाैरव करण्यात आला. तर ‘लायन्स जीवन गाैरव पुरस्कार’ भिक्षेक-यांच्या पुनर्वसनासाठी काम करणारे डाॅ. अभिजित साेनावणे यांना देण्यात आला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading