शिंदे सरकारच्या कारभारावर शरद पवार म्हणाले, काय झाडी, काय डोंगर हेच ऐकायला मिळतय
पुणे : राज्यात नवीन स्थापन झालेले शिंदे व फडणविस सरकार चा कारभार कसा चालला आहे. यावर विविध नेत्यांनी व लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यावर राज्यात शिंदे आणि फडणवीस सरकारचा कारभार अजून मला दिसलेलाच नाही. कारभार पाहता सगळी यंत्रणा थंड झाल्या आहेत का असा प्रश्न मनात येतो. आता काय झाडी, काय डोंगर हेच ऐकायला मिळत आहे. महाराष्ट्रावर राज्यकर्त्यांचं लक्ष आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. असं शरद पवार म्हणाले.
फॉक्सकॉन प्रकल्प गेल्यामुळे त्यापेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देऊ हे बोलणं म्हणजे रडणाऱ्या लहान मुलाला मोठा फुगा दाखवण्यासारखं असल्याचं म्हणत शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र नेहमीच प्रथम क्रमांकावर होता. पण फॉक्सकॉनसारखा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जातो हे खरंच दुर्दैवी आहे.असंही शरद पवार म्हणाले.
दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या संबंधी दूषणं द्यायची, वाद करायचे या गोष्टी बंद करायला हव्यात आणि महाराष्ट्रातील वातावरण सुधारून विकासाच्या दृष्टीने आपण पुढे कसे जाऊ, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.असा सल्ला शरद पवारांनी सत्ताधारी आणि विरोधकांना दिला.
