महाराष्ट्राला लॉलीपॉप मिळाल राज्य सरकार विरोधात सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे आंदोलन
पुणे : वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली आज बालगंधर्व रंगमंदिर चौकात लॉलीपॉप आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
महाराष्ट्राला काय मिळालं? लॉलीपॉप लॉलीपॉप..” अशाप्रकारच्या अनोख्या घोषणाबाजी करत त्यांनी हे आंदोलन केलं. राज्य सरकारवर टीका करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते कायम वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलनं करत असतात. यावेळी त्यांनी लॉलीपॉप हाती घेत निदर्शनं केली. फॉक्सकॉन प्रकल्पावरुन आता महाराष्ट्राचं राजकारण तापताना दिसत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अंतिम झालेला सेमीकंडक्टरचा प्रकल्प भाजपमुळे गुजरातमध्ये गेल्याचा आरोप नेत्यांकडून केला जात आहे. हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर नेल्यानंतर यापेक्षा मोठे प्रकल्प महाराष्ट्राला देऊ असं आश्वासन केंद्र सरकारकडून देण्यात आलं आहे. मात्र हे आश्वासन फोल आहे. या सगळ्यात महाराष्ट्राला लॉलीपॉप देण्यात आलं आहे, असं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे. या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदीप देशमुख, मृणाल वाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रदीप देशमुख म्हणाले, राज्यातील एक ते सव्वा लाखांहून अधिक रोजगार निर्माण करण्याची क्षमता असणारा सुमारे 1 लाख 58 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असणारा हा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेला. महाविकास आघाडी सरकारने सर्व काही सुरळीतपणे पार प्रक्रिया पार पाडून हा प्रकल्प महाराष्ट्रत साकारण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे काम केले होते. ईडी सरकारने तरुणांच्या हक्काचा घास हिरावून घेतला आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदीप देशमुख यांनी केला आहे
