Friday, September 11, 2026
ENTERTAINMENTLatest News

कुणीतरी येणार गं…

सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत रंगणार गौरीच्या डोहाळजेवणाचा कार्यक्रम

गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या सुखाची जयदीप-गौरी आणि संपूर्ण शिर्केपाटील कुटुंब आतुरतेने वाट पहाट होते तो क्षण अखेर आलाय. लवकरच शिर्के पाटील कुटुंबात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. या चिमुकल्या पाहुण्याच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु असून मालिकेत लवकरच गौरीच्या डोहाळजेवणाचा कार्यक्रम पाहायला मिळणार आहे. माईंच्या आग्रहाखातर पारंपरिक पद्धतीने या डोहाळजेवणाची तयारी करण्यात आलीय. गौरीच्या आवडत्या पदार्थांची मेजवानी असेलच सोबतीला फुलांच्या दागिन्यांनी गौरीला सजवण्यात आलंय. शालिनी आणि देवकी डोहाळजेवणाच्या कार्यक्रमात एक खास नृत्यही सादर करणार आहेत.

मात्र शुभकार्यात विघ्न आणलं नाही ती शालिनी कसली. गौरीच्या डोहाळजेवणाच्या कार्यक्रमात गौरीला जीवे मारण्याचा शालिनीने डाव रचलाय. शालिनीचा हा डाव यशस्वी होणार का हे पाहायचं असेल तर नक्की पाहा सुख म्हणजे नक्की काय असतं रात्री ९.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading