Friday, September 11, 2026
BusinessLatest News

स्‍कोडा ऑटो इंडियाच्‍या फॅन्‍स ऑफ स्‍कोडा उपक्रमाला पुणेकरांचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद

पुणे : अहमदाबाद, बेंगळुरू, कोलकाता, भुवेनश्‍वर आणि हैदराबाद येथे यशस्‍वीरित्‍या राबवल्‍यानंतर फॅन्‍स ऑफ स्‍कोडा उपक्रम पुण्‍यामध्‍ये दाखल झाला, जेथे फॅन्‍स ऑफ स्‍कोडा उपक्रम ११ सप्‍टेंबर रोजी पुण्‍यामध्‍ये सादर करण्‍यात आला. या इव्‍हेण्‍टने स्‍कोडा चाहते व ग्राहकांना स्‍कोडा इंडिया व्‍यवस्‍थापनाशी संलग्‍न होण्‍यासोबत त्‍यांच्‍याशी संवाद साधण्‍याची संधी दिली. स्‍कोडा ग्राहकांना मोहिमा, इव्‍हेण्‍ट्स, उत्‍पादन लॉन्‍च यांमध्‍ये सहभाग घेता येण्‍यासाठी आणि प्रत्‍यक्ष कंपनीच्‍या अव्‍वल व्‍यवस्‍थापनासोबत संवाद साधण्‍यासाठी गोव्‍यामध्‍ये प्रायोगिक तत्त्वावर फॅन्‍स ऑफ स्‍कोडा उपक्रमाची सुरूवात झाली.

स्‍कोडा ऑटो इंडियाचा विश्‍वास आहे की, कार्स विद्यमान व्‍यवसायाच्या मुलभूत पाया असल्या तरी चाहते व ग्राहकांच्‍या आपुलकीने बाजारपेठेत ब्रॅण्‍डची गती कायम ठेवली आहे. स्‍कोडा ऑटो इंडियाच्‍या वाढत्‍या टचपॉइण्‍ट्सच्‍या माध्‍यमातून ग्राहकांसोबतचे नाते दृढ करण्‍याच्‍या प्रयत्‍नामध्‍ये पुणे प्रदेशातील ग्राहकांसाठी प्रमुख भूमिका बजावते.

सध्‍या पुण्‍यामध्‍ये असलेला फॅन्‍स ऑफ स्‍कोडा उपक्रम भारतभरातील ९ इतर शहरांमध्‍ये वाटचाल करेल. पुणे, हैदराबाद व भुवनेश्‍वर नुकतेच आयो‍जित करण्‍यात आलेल्‍या फॅन्‍स ऑफ स्‍कोडा उपक्रमांमध्‍ये पुण्‍यातील जवळपास १२० चाहते व ग्राहक या इव्‍हेण्‍ट्सना उपस्थित होते. ग्राहक सहभाग व ग्राहक समाधानासाठी या अद्वितीय उपक्रमाने स्‍कोडा ऑटो इंडियाकरिता काही मोठे यश संपादित केले आहेत. कंपनीने जानेवारी ते ऑगस्‍ट २०२२ पर्यंत ३७,५६८ युनिट्सच्‍या विक्रीची नोंद केली, जी भारतातील कंपनीच्‍या प्रवासामधील आतापर्यंतची सर्वोच्‍च विक्री आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading