Friday, September 11, 2026
Latest NewsLIFESTYLE

सांस्कृतिक वारसा जोपासण्यासाठी अनोख्या फॅशन शो चे आयोजन

पुणे : भारताचा सांस्कृतिक वारसा जोपासण्यासाठी अनोख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मृणाल एंटरटेनमेंट यांच्यावतीने मिस आणि मिसेस हेरिटेज इंडिया फॅशन शोचे आयोजन करण्यात आले आहे. यंदा या स्पर्धेचे दुसरे वर्ष आहे. देशभरातून अनेक महिलांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. राज्यातील विविध ठिकाणी स्पर्धेची प्राथमिक फेरी पार पडली असून अंतिम फेरी पुण्यामध्ये शुक्रवार दिनांक १६ सप्टेंबर रोजी पार पडणार आहे. स्पर्धेचे मुख्य प्रायोजक ‘संकल्प’ असून आयोजन मृणाल एंटरटेनमेंट यांनी केले आहे.

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, सिनेदिग्दर्शक अभिजीत पानसे, संकल्पचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. पी.एन. कदम हे प्रमुख पाहुणे असणार आहेत. याशिवाय मराठी सिनेसृष्टीतील अनेक नामवंत कलाकारांची उपस्थिती यावेळी असणार आहे.

आयोजक मृणाल गायकवाड म्हणाल्या की, भारताला अतिशय समृद्ध वारसा मिळाला आहे. सांस्कृतिक वारसा हा काही पुरातन अवशेष आणि वस्तुसंग्रह सांभाळण्यावर संपत नाही. त्यात परंपरा किंवा जिवंत अभिव्यक्ती, जी आपल्या पूर्वजांकडून आपल्यापर्यंत येते आणि आपल्या वारसांकडे जाते, त्याचाही समावेश होतो. बोली परंपरा, सादरीकरणाची कला, सामाजिक रिवाज, विधी, सणसमारंभ, निसर्गाशी संबंधित ज्ञान आणि पारंपरिक कारागिरी यासारख्या उदाहरणांवरून दिसते. या यादीतून सांस्कृतिक वैविध्य आणि सृजनात्मक अभिव्यक्ती दिसून येते. मुळातच आपल्या ऐतिहासिक वास्तू, प्राचीन परंपरा या आपल्या व्यक्तिमत्वाचा, आपल्या जीवनशैलीचा भाग असतात. कारण आपली जडण घडण यातूनच तर झालेली असते. एका अर्थाने वारसा म्हणजे ममत्वाचा मातृत्वाचा विषय ठरतो. आपला ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा पुढच्या पिढ्यांना कळावा, त्याविषयी माहिती आपल्या मुलांपर्यंत पोहोचावी याकरीता या फॅशन शोचे आयोजन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading