Thursday, June 18, 2026
ENTERTAINMENTLatest News

वैशाली सामंत यांची पहिली निर्मिती असलेलं ‘सांग ना’ गाणं प्रदर्शित

आपल्या सर्वांची आवडती लाडकी गायिका वैशाली सामंत हिने इतकी वर्षे वेगवेगळ्या जॉनर्सची गाणी गाऊन आपलं एक अढळ स्थान निर्माण केलं आहे. हिंदीमराठी तसेच इतर कुठल्याही भाषांमध्ये वैशाली सामंत सहजतेने वावरलेली आहे. आणि फक्त गायिकाच नव्हे तर संगीतकारगीतकार असा तिचा प्रवास उंचावत गेला आहे. आता आणखी एक पाऊल पुढे म्हणजे निर्मिती क्षेत्रात तिने पदार्पण केलं आहे. ते निमित्त म्हणजे टी सिरीज प्रस्तुत “सांग ना…!”

टी सिरीज आणि वैशाली सामंत यांनी मिळून केलेलं हे पहिलं इंडिपेंडंट साँग आहे. आणि या गाण्याची खासियत म्हणजे या गाण्यात अभिजित खांडकेकर आणि सुखदा खांडकेकर जे दोघंही उत्कृष्ट कलाकार आहेत आणि खऱ्या आयुष्यात नवरा बायको आहेत ते या गाण्याच्या निमित्तानं पडद्यावर आपल्याला पहिल्या प्रथमच एकत्र दिसणार आहेत. सांग ना…‘ या गाण्यात छोटीशी उत्कंठावर्धक कथा आहे. कथा जरी मॅाडर्न आॅफिसमधली असलीतरी त्यातील शब्दरचना रांगड्या भाषेतील आहे. त्यामुळं हे गाणं रसिकांना वेगळाच अनुभव देणारं ठरेल. याचं कॅाम्पोझिशन आणि व्हिडीओ एकदम कॉन्ट्रास्ट आहे.

सांग ना…‘ या गाण्याबद्दल बोलताना वैशाली सामंत अश्या म्हणाल्याफिल्मी आणि नॉन फिल्मी अश्या दोन प्रकारचं संगीत असतंजेव्हा तुम्ही नॉन फिल्मी म्हणजे आजच्या भाषेत म्हणायचं तर इंडिपेंडंट गाणं करतातेव्हा ते गाणं कसं असावं याचे फ्रीडम आपल्याला असते. आणि ते गाणं चांगलं करण्याची जबाबदारीही आपलीच असते. माझ्यासाठी गाणं म्हणजे एक दागिना आहे. त्याची जडण घडण कशी असावीतो दागिना सुंदर दिसण्यासाठी जशी नजकात महत्वाची आहे तसेच गाण्याचे आहे. त्याचे शब्दत्याची चालत्याचा ठेका आणि त्याच्यातील स्वर हे सगळे इंपॉर्टन्ट अस्पेक्ट्स आहेत. आणि मी प्रत्येकवेळी हा प्रयत्न करते कि माझ्याकडून माझ्या श्रोत्यांसाठी काहीतरी वेगळा जॉनरवेगळा दागिना मी सादर करू शकेन. या वेळी जेव्हा सांग ना.. मी ऐकलं तेव्हा असंच वाटलं कि ह्या प्रकारचं गाणं या आधी माझ्याकडून नाही झालंय. सांग ना..मध्ये शब्दठेकाआणि एक छान ट्रान्स असलेली चाल आहे आणि एका मुलीचा हट्ट आहेस्वताच्या प्रियकरासाठी ती गाताना कसे एक्सप्रेशन आहेतहे सगळं बघून मला असं वाटलं कि हे मी गावं आणि मग सांग ना या गाण्याची खऱ्या अर्थानं प्रोसेस सुरु झाली. अश्विनने ज्या तऱ्हेने याचे शब्द लिहिलेत त्याच्या कॉन्ट्रास्ट याचा व्हिडीओ असावा असं लगेच मनात आलं. टीसिरीजला हे गाणं आवडलं आणि त्यांनी मलाच या गाण्याची निर्मिती करण्यास सांगितली. आणि त्यामुळेच मी गायिकासंगीतकार थोडीशी गीतकार करता करता आज निर्माती झाले. 

ऐका प्रॉडक्शन या नावच एक मुझिक प्रॉडक्शन लेबल सुरु केलं आहे. ही मुझिक कंपनी नाहीयेफक्त मुझिक प्रॉडक्शन लेबल आहे आत्तातरी. कारण गाण्याच्या क्षेत्रात बरंच काही चालू आहेमाझ्या मनातला व्हिडीओ कसा असावा याविषयी माझ्या मनात नेहमी कुतूहल असायचेव्हिडीओ असा पाहिजेतसा पाहिजे तर या निमित्ताने मी माझ्या मनातला व्हिडीओ तुमच्या समोर सादर करत आहे. अभिजित आणि सुखदा खांडकेकर यांनी माझ्या व्हिडीओत येण्यास मान्यता दिली ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. पहिलीच वेळ होती माझी प्रॉडक्शनची तरीही त्या दोघांनी जे आज इंडस्ट्रीत अत्यंत नामवंत आणि रुजलेले असे कलाकार आहेत. त्यांनी माझ्या नवीन प्रॉडक्शनमधे यायला हो म्हटलं ही खूप मोठ्ठी गोष्ट आहेमी त्यांची खूप आभारी आहे. विशेषकरून राहुल खंदारे याचं मी कौतुक करेनमाझी जी संकल्पना होती व्हिडीओची ती अब्झोरब करून अतपासून इति;पर्यंत त्यांनी माझी साथ दिली आहे. International Institute of Sports Management (IISM)चे माझे मित्र निलेश आणि रसिका कुलकर्णी यांनी या गाण्याच्या व्हिडिओसाठी त्यांचे ऑफिस उपलब्ध करून दिले त्यामुळेच माझ्या मनातला हा व्हिडीओ आपल्यासमोर मी साकार करू शकले आहे.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading