… मग काल जे पुण्यात झालं त्याच काय – डॉ. नीलम गोऱ्हे
पुणे : काल पुण्यात मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे आंबील ओढा भागात अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले. पार्श्वभूमीवर प्रशासक येण्यापूर्वी भाजपला एक हाती सत्ता होती तरीपण काम नाही केलं.तुमचा कुठलाच नगरसेवक काल रस्त्यावर उतरला नाही. मुंबईत असा घडल की आमच्या ७ पिढ्या तुम्ही काढता मग काल पुण्यात जे झाल त्याच काय? आता सवाल विधानसभेचे उपसभापती व शिवसेनेचे नेत्यां डॉक्टर नीलम गोऱ्हे त्यांनी भाजपला विचारला.
पुण्यातील पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे शहर प्रमुख गजानन थरकुडे, संजय मोरे, पुणे महापालिकेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, शहर संघटक राजेंद्र शिंदे, आनंद गोयल उपस्थित होते.
गोऱ्हे म्हणाल्या, अंबिल ओढा येथील भींत शासनाने दोन-तीन महिन्यापूर्वी पाडली आहे. ज्यामुळे ओड्याचे पाणी अनेक नागरिकांच्या घरात घुसत आहे. प्रशासक येण्यापूर्वी भाजपला एक हाती सत्ता होती तरीपण हे काम का झालेल नाही. हापालिकेची आपत्ती व्यस्थपक यंत्रणा काय करत होती? काल भाजपचा एकही नगरसेवक नागरिकांच्या मदतीला आला आही. तुम्हाला मेट्रो उद्घाटनाच श्रेय पाहिजे पण काम करायला नको. असा सवाल नीलम गोऱ्हे यांनी भाजपला विचारला.
नीलम गोऱ्हे म्हणाल्या, पालकमंत्री नसल्यामुळे पुण्यातील काही भागात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. असा आरोप विरोधक करत आहे. प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्री नाहीत. त्यामुळे मी उसभापती म्हणुन आदेश देते तुम्हीं काय नियोजन केलं आहे. ते सादर करा माझ पत्र लवकरच तुम्हाला मिळेल, असा आदेश त्यांनी भाजपला दिला.
