Wednesday, June 17, 2026
BusinessLatest News

टाटा एआयए लाइफ इन्शुरन्सने दुबईमध्ये केला विस्तार

पुणे  – भारतातील एक आघाडीची जीवन विमा कंपनी, टाटा एआयए लाईफ इन्शुरन्सने (टाटा एआयए) संयुक्त अरब अमिरातीमध्ये दुबईत आपले पहिले प्रतिनिधी कार्यालय सुरु केल्याची घोषणा आज केली.

यूएईमधील भारतीयांच्या गरजा समजून घेण्यात हे प्रतिनिधी कार्यालय टाटा एआयएला मदत करेल. सध्या ही कंपनी आपल्या ३९१ डिजिटल फर्स्ट शाखांमार्फत २.३ मिलियनपेक्षा जास्त ग्राहकांना सेवासुविधा पुरवते.

टाटा एआयए लाइफचे अध्यक्ष आणि मुख्य वितरण अधिकारी श्री वेंकी अय्यर म्हणाले, “ग्राहकांच्या गरजा आणि जीवन उद्दिष्टांना अनुकूल सर्वोत्कृष्ट आणि सर्वात सहजसोप्या जीवन आणि आरोग्य विमा सुविधा प्रदान करून सक्षम बनवणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. हे प्रतिनिधी कार्यालय आम्हाला आमच्या ग्राहकांच्या गरजा समजून घेण्यात आणि आमच्या सेवांमध्ये नावीन्य आणण्यात मदत करेल.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading