पुढील 4 तासात पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता
पुणे : भारतीय हवामान विभागाने येत्या पाच दिवसांत महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यानुसार काल पुण्यात ढगफुटी सादृश्य पाऊस झाला. तर पुढील चार तासात अहमदनगर, बीड, पुणे सातारा यांसह महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार ते अतीमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज (12 सप्टेंबर) अहमदनगर, रत्नागिरी, बीड, पूर्वोत्तर पुणे, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे या भागांत पुढील 3, 4 तासांत गडगडाटी वादळाची शक्यता आहे. तसेच मराठवाड्यात व विदर्भातही काही भागात मुसळधार पावसाची शकायता वर्तवण्यात आली आहे.
12 Sept: Possibility of mod to intense thunderstorms associated with rains over parts of Ahmednagar, Ratnagiri Beed, NE of Pune, Ghat areas of Satara, Sindhudurg, South of solapur, Thane during next 3, 4 hrs as seen in the latest satellite obs at 1600 hrs.
Mumbai cloudy sky pic.twitter.com/0PvZi8aLIJ— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 12, 2022
