Sunday, September 13, 2026
BusinessLatest News

बीपीसीएलने जिंकला सप्लाय चेन लीडरशीप पुरस्कार

मुंबई : भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या महारत्न पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग आणि भारतातील दुसऱ्य क्रमांकाच्या सर्वात मोठ्या उर्जा पीएसयू कंपनीने ईएलएससीच्या ( एक्सप्रेस, लॉजिस्टिक्स आणि सप्लाय चेन) चौदाव्या आवृत्तीत लीडरशीप पुरस्कार मिळवला आहे. कंपनीने एकाच प्लॅटफॉर्मवरून क्रुड ऑइल प्राप्ती आणि उत्पादन वितरणामध्ये मल्टी रिफायनरी पीआयएमएसचा (एमपीआयएमएस) समावेश असलेले क्रॉस फंक्शनल अलायन्स राबवल्याबद्दल बेस्ट इन क्लास क्रॉस फंक्शनल कोलॅबरेशन विभागात हा पुरस्कार मिळवला आहे.

ताज लँड्सएंडमुंबई येथे झालेल्या १४ व्या ईएलएससी लीडरशीप पुरस्कार सोहळ्यात टीम एससीओने हा पुरस्कार जिंकला.

याप्रसंगी आय/सीचे (एससीओ) मुख्य व्यवस्थापक आर. श्रीकुमार म्हणाले, ‘या पुरस्काराने बीपीसीएल टीमला अतिशय आनंद झाला आहे. ‘शांतपणे काम करा आणि आपल्या यशाचा आवाज होऊद्या’ हे आमचे ब्रीदवाक्य आहे. आम्ही स्वतंत्र प्राप्ती आणि वितरणाच्या पारंपरिक पद्धतींच्या पलीकडे जाण्याचा भविष्यवेधी मार्ग स्वीकारला व त्यासाठी जागतिक पातळीवर सर्वसमावेशक अस्पेनटेक मल्टी- रिफायनरी एम- पीआयएमएस मॉडेलचा (एमपीआयएमएस – मल्टी प्रोसेस इंडस्ट्री मॉडेलिंग सिस्टीम) योग्य वापर केला. एमपीआयएमएसद्वारे अमलबजावणी केल्यामुळे आम्हाला सर्व प्रक्रियेवर लक्ष ठेवणे आणि उत्पादनाची मागणी व लॉजिस्टिक्ससह क्रुड खरेदीच्या योग्य ट्युनिंगसाठी पर्याय दर्शवणे शक्य झाले.’

सप्लाय टेन समिट ही लीडरशीपवर केंद्रित परिषद साखळी पुरवठा आणि प्राप्ती धोरण सुधारण्यासाठी तयार करण्यात आली आहे. ही परिषद विविध संकल्पनांची देवाणघेवाण करण्यासाठी, बाजारपेठेच्या समीकरणांवर होणारा परिणाम लक्षात घेत एकत्र येण्यासाठी, सद्य व भविष्यकालीन पुरवठा साखळीशी संबंधित नवे तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी व ऑपरेशन्ल लीडर्स तयार करण्यासाठीचे व्यासपीठ ठरत आहे.

प्रत्येक रिफायनरीसाठी योग्य क्रुड मिक्स तयार करणे, पेट्रोलियम उत्पादनांचा अविरत पुरवठा होईल याची काळजी घेणे आणि रिफायनरीच्या आर्थिक गणितांचा वापर करणे ही सप्लाय चेन ऑप्टिमायझेशन (एससीओ) टीमसाठी गुंतागुंतीची समस्या असते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading