Wednesday, June 17, 2026
Latest NewsSports

Sportsfield Monsoon League – गॅरी कर्स्टन क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघाचा तिसरा विजय !!

पुणे : स्पोर्ट्सफिल्ड मॅनेजमेंट तर्फे आयोजित पहिल्या ‘स्पोर्ट्सफिल्ड मान्सुन लीग’ अजिंक्यपद १४ वर्षाखालील ३०-३० षटकांच्या क्रिकेट स्पर्धेत गॅरी कर्स्टन क्रिकेट अ‍ॅकॅडमी ब संघाने तिसरा विजय मिळवत स्पर्धेत आगेकूच केली.

सातारा रोड येथील टेंभेकर फार्मस् क्रिकेट मैदानावर झालेल्या या स्पर्धेत मयांक अगरवाल याच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर गॅरी कर्स्टन क्रिकेट अ‍ॅकॅडमी ब संघाने फल्लाह क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा ५ गडी राखून पराभव करून तिसरा विजय नोंदविला. पहिल्यांदा फलंदाजी करताना फल्लाह क्रिकेट अ‍ॅकॅडमीने १९.४ षटकामध्ये ७८ धावा जमविल्या. यश ससाणे याने सर्वाधिक २२ धावा काढल्या. गॅरी कस्टर्न संघाच्या मयांक अगरवाल याने १० धावात ३ गडी बाद केले. सिध्दांत गुप्ता (२-१९) आणि राशी व्यास (२-१८) यांनीही चमकदार गोलंदाजी करून फल्लाह अ‍ॅकॅडमीला ७८ धावांवर रोखले.

गॅरी कर्स्टन क्रिकेट अ‍ॅकॅडमी ब संघाने हे आव्हान १८.२ षटकात व ५ गडी गमावून पूर्ण केले. समवेद गायकवाड (२४ धावा), अहमद सिद्दकी (नाबाद ११ धावा) आणि मानस पाटील (नाबाद १७) यांनी धावांचे योगदान देत संघाला विजय मिळवून दिला.

सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
फल्लाह क्रिकेट अ‍ॅकॅडमीः १९.४ षटकात १० गडी बाद ७८ धावा (यश ससाणे २२, निखील काबळे नाबाद १२, मयांक अगरवाल ३-१०, सिध्दांत गुप्ता २-१९, राशी व्यास २-१८) पराभूत वि. गॅरी कर्स्टन क्रिकेट अ‍ॅकॅडमी बः १८.२ षटकात ५ गडी बाद ७९ धावा (समवेद गायकवाड २४, अहमद सिद्दकी नाबाद ११, मानस पाटील नाबाद १७, इस्माईल सय्यद ३-२२); सामनावीरः मयांक अगरवाल.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading