Friday, September 11, 2026
Latest NewsPUNE

इंडीयन रेड क्रॉस सोसायटीकडून गणेश भक्तांसाठी आरोग्य सेवेची मदत

पुणे : श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मी रस्त्यावर श्री गणेश भक्तासाठी व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना प्रथमोपचार व इतर आरोग्य विषयक साहित्य मोफत वाटप करून इंडीयन रेड क्रॉस सोसायटी व,इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या युवक विभागातर्फे भारतीय जीवन विमा निगम यांचे सहकार्याने दि 9 सप्टेंबरच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मी पथावर नागरिकांच्या सेवेसाठी मोफत प्रथमोपचार, मोफत पिण्याचे पाणी व इतर सेवा केंद्र चालविण्यात आले .५० हून अधिक नागरिकांना प्रथमोपचार सुविधा देण्यात आली. अतिशय मोलाची मदत केली आहे . आरोग्य सेवे बरोबर गणेश भक्तांना पाणी वाटप ही या संस्थेने केले आहे .

इंडीयन रेड क्रॉस सोसायटी वर्षानुवर्षे अशाप्रकारे सेवा करीत आहे . करोना काळात ही या संस्थेने थालसेमिया केंद्रात रुग्णांना मोफत रक्तसंक्रमण सुविधा पुरवली. करोना काळात मोफत रुग्णवाहिका ची सेवा पुणेकरांना दिली होती,गरजूंना मोफत रुग्णवाहिका उपक्रम जय हो या नावाने संस्थेने अजून सुध्दा चालू ठेवला आहे .
या कार्यक्रमात इंडीयन रेड क्रॉस सोसायटी पुणे जिल्हा शाखा चे पदाधिकारी ,डॉक्टर ,नर्सेस उपस्थित होते
मोफत पिण्याचे पाणी गणेशमंडल चे कार्यकर्ते व नागरिकांना पुरविण्यात आले व याचा लाभ हजारो नागरिकांनी घेतला व संस्थेला दुवा दिला व विद्यार्थी स्वयंसेवकांच कौतुक केले. रेड क्रॉसतर्फे मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी शाळेची इमारत बांधण्यात येत आहे,त्यासाठी नागरिकांनी स्वतः हुन निधी दिला.विविध महाविद्यालयातील 75 युवक यात सामील होते.डॉ सविता व मिलिंद पोरे यांनी 9 व 10 सप्टेंबर रोजी प्रथमोपचार सेवा दिली,त्यांना भारती विद्यापीठ च्या विद्यार्थ्यांनि मदत केली.भारतीय जीवन विमा निगम कार्यालयाचे विभागीय व्यवस्थापक संदीप मोघे व शाखा व्यवस्थापक मुकुंद भाईक यांनी सहकार्य केले व मदत केली.उपक्रमाचे संयोजन युवक रेड क्रॉसचे अद्यक्ष सतीश कांकरिया व उपाध्यक्ष दिपक शहा व क्षेत्रीय अधिकारी श्यामला पाटील यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading