Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुक तब्बल 29 तास चालली; मानाच्या गणपतींनी घेतला सर्वाधिक वेळ  

पुणे : दोन वर्षांनंतर थाटात पार पडलेली पुणे शहरातील गणेश विसर्जन मिरवणुक तब्बल 29 तास चालली. या विसर्जन मिरवणुकीत मानाच्या गणपतीनी सर्वाअधिक वेळ घेतला असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.

अमिताभ गुप्ता म्हणाले की, कोरोनानंतर तब्बल दोन वर्षानी गणेशोत्सव असल्याने आगमन आणि विसर्जन मिरवणुक पाहण्यास नागरिक मोठ्या संख्येने येणार ही शक्यता होती. त्यानुसार 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबर 2022 या संपूर्ण गणेशोत्सवा दरम्यान कोणत्याही भागात अनुचित घटना घडू नये. यासाठी ठिकठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच शहरात 3 हजार 600 मंडळ असून त्यातील जवळपास 3 हजार मंडळांनी शुक्रवारी विसर्जन केले आहे.

तसेच ते पुढे म्हणाले की, मागील आठ ते नऊ वर्षातील विसर्जन मिरवणुकी करिता 28 तास कधी तर कधी 28 तास 50 मिनिट लागले आहेत. तर यंदा ही मिरवणुक 29 चालली आहे. मात्र या मिरवणुकी दरम्यान मानाच्या गणपती अधिक वेळ लागला. मात्र त्यानंतरच्या गणपती मंडळींनी वेळ घेतला नाही. तसेच विसर्जन मिरवणुक पाहण्यास येणार्‍या अनेक नागरिकांचे मोबाईल किंवा सोन्याची दागिने चोरीच्या घटना घडल्या आहेत.

पुण्यात गेल्या आठ वर्षात मिरवणुकीसाठी लागलेला वेळ
2014- 29 तास 12 मिनिटे

2015- 28 तास 38 मिनिटे

2016- 28 तास 30 मिनिटे

2017- 28 तास 05 मिनिटे

2018- 26 तास 36 मिनिटे

2019-24 तास

2020 आणि 2021 कोरोना

2022 -29 तास

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading