मिरवणूकीचा खर्च टाळून सामाजिक संस्थेस आर्थिक मदत..
नवी पेठेतील उत्सव मित्र मंडळाचा स्तुत्य उपक्रम..
पुणे : गणेश आगमन आणि विसर्जन मिरववणूक न काढता त्या खर्चाचा सामाजिक कार्यास देत नवी पेठेतील उत्सव मित्र मंडळाने इतर मंडळांसमोर आदर्श ठेवला आहे. मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत, आत्महत्याग्रस्त शेतकरी, शेतमजूर, ऊसतोड कामगार यांच्या मुलांच्या शिक्षण व संगोपनाचे काम मोफत करणाऱ्या तसेच, खेड्यातील लेकरांचे शिक्षण, संगोपन गरिबीमुळे थांबणार नाही यासाठी प्रयत्न करणाऱ्या “स्नेहवन” या सामाजिक संस्थेस २१००० रुपयाचे आर्थिक सहाय्य केले. स्नेहवन संस्थेचे संचालक अशोक देशमाने यांना अभय छाजेड व स्वप्नील बापट यांच्या हस्ते सुपूर्त केला. यावेळी मंडळाचे कार्याध्यक्ष सुधीर काळे आणि अध्यक्ष अतुल धर्मे व कार्यकर्ते सुमित काळे, अनिल तापकीर, रणजीत काळे, शैलेश कदम, प्रतिक काळे, तुषार सस्ते, गौरव काळे, आकाश खराटे उपस्थित होते. यावेळी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष स्वप्नील बापट यांच्या शुभहस्ते श्रींची आरती संपन्न झाली.
