श्रीमंत दगडूशेठ गणपतीची आरतीची ज्योत सदैव तेवत रहाणार..
मास्मा संघटनेच्यावतीने श्रीमंत दगडूशेठ गणपतीची सौर दिव्यांनी आरती
पुणे : भारतात पहिल्यांदाच अपारंपारिक उर्जेवर चालणाऱ्या सौर दिव्यांनी श्रीमंत दगडूशेठ गणपतीची आरती करण्यात आली आहे. महाराष्ट्र सोलर मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशनच्या (मास्मा) वतीने २१ अपारंपरिक ज्योतीचे दिवे दगडूशेठ गणपती चरणी अर्पण करण्यात आले. त्यामुळे या सौर दिव्यांची ज्योत गणपतीसमोर सदैव तेवत राहणार आहे. मास्माचे संचालक समीर गांधी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम करण्यात आला. महावितरण पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता सचिन तालेवार, सामाजिक कार्यकर्ते डॉ. शैलेज गुजर, मास्माचे अध्यक्ष रोहन उपासनी, सचिव स्वप्नील बाठे, शशिकांत वाकडे, राजेश मुथा, प्रदीप कुलकर्णी, समीर गांधी, नरेंद्र पवार, संजय कुलकर्णी, प्रदीप कुलकर्णी उपस्थित होते.
मास्माचे अध्यक्ष रोहन उपासनी म्हणाले की, विजेची वाढती मागणी आणि पुरवठा लक्षात घेता गणेश मंडळांनी जास्तीत जास्त पर्यावरणपूरक पद्धतीने उत्सव साजरा करण्याची गरज आहे. भविष्यकाळातील ऊर्जेची गरज भागवण्याची क्षमता अपारंपारिक उर्जेवर चालणाऱ्या उपकरणांमध्ये आहे. त्यामुळे संघटनेच्यावतीने अपारंपारिक उर्जेवर चालणार्यार सौर दिव्यांनी श्रीमंत दगडूशेठ गणपतीची आरती करुण समाज्यात एक नवा आदर्श उभा केला आहे. सौरऊर्जा निर्मितीत आणि नंतर वापरातही कुठल्याही प्रकारचे अपायकारक वायू वातावरणात सोडले जात नाहीत. त्यामुळे या उपकरणांमध्ये कार्बन उत्सर्जनचे प्रमाण कमी आहे. गणेश मंडळांनी कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी जास्तीत जास्त सौर उर्जेचा वापर करावा असे आवाहन यावेळी उपासनी यांनी केले.
