गणेश विसर्जन मिरवणूक 2022 : पुणे शहरातील 17 रस्ते राहणार वाहतुकीसाठी बंद
पुणे : पुणे शहरातील गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी लांबून लांबून नागरिक येत असतात. यंदा तर तब्बल दोन वर्षांच्या गॅप नंतर विसर्जनाची मिरवणूक पार पडणार आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून शहरातील वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. उद्या (9 ऑगस्ट) पुण्यातील 17 रस्ते हे वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत.
गणपती विसर्जनाची मिरवणूक ज्या मुख्य रस्त्यावरन जाते ते रस्ते वाहतुकीसाठी बंद असणार आहेत. दरवर्षी लक्ष्मी रस्ता, केळकर रस्ता, कुमठेकर रस्त्यावर असणार मुख्य विसर्जन मिरवणूकीचा मार्ग असतो. त्यामुळे या मार्गाची वाहतूक बंद ठेवण्यात येते. त्याच बरोबर उद्या प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी असणार बंद असणार आहे. रात्री विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत या सगळ्या रस्त्यांवरुन वाहतूक बंद असणार आहे.
कुठले रस्ते बंद असणार?
लक्ष्मी रस्ता, शिवाजी रस्ता, बगाडे रस्ता, बाजीराव रस्ता, कुमठेकर रस्ता, गणेश रस्ता, गुरुनानक रस्ता, टिळक रस्ता, शास्त्री रस्ता, जंगली महाराज रस्ता सकाळपासून वाहतूकीसाठी बंद असणार आहेत. त्यासोबतच कर्वे रस्ता, फर्ग्यूसन रस्ता, भांडारकर रस्ता, पुणे-सातारा रस्ता, सोलापूर रस्ता, प्रभात रस्ता हे सगळे रस्ते उद्या दुपारी 12 नंतर वाहतूकीसाठी बंद असणार आहे.
येथे असेल पार्किंगची सोय
मिरवणुकीदरम्यान पार्किंगची सोय करण्यात आली आहे. यात गरवारे कॉलेज, कर्वे रोड, डेक्कन एज्यूकेशन सोसायटी टिळक रोड, कॉंग्रेस भवन मनपा रोड, मनपा भवन पार्किंग, सी. ई. ओ. पी ग्राउंड, मंगला टॉकीज, हमालपाडा पार्किंग नारायणपेठ, नदीपात्रातील रस्ता, संजीवनी हॉस्पिटल, जैन हॉस्टेल बीएमसीसी रोड, आपटे प्रशाला या ठिकाणी मिरवणुकी दरम्यान पार्किंगची सोय करण्यात आली आहे.
