पुण्याच्या विसर्जन मिरवणुकीवर असणार 5 हजार पोलीसांची नजर
पुणे : यंदा पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक तब्बल दोन वर्षांनी पुन्हा एकदा मोठ्या जल्लोषात पार पडणार आहे. यंदा ढोल पथकांवर कोणतेही निर्बंध नाहीत. त्यामुळे मिरवणूक किती तास चालते हे पहावे लागेल. तसेच यंदा नेहमीपेक्षा जास्त गर्दी होण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर पुणे पोलीस सज्ज आहे. यंदा विसर्जन मिरवणुकीदरम्यान शहरात 5 हजार पोलीस तैनात असणार आहे, अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
अमिताभ गुप्ता म्हणाले, आजपासूनच शहरात अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्ताला सुरुवात करणार आहोत. मानाच्या गणपतीबरोबरच शहरातील किमान 3 हजार सार्वजनिक गणेश मंडळाचं विसर्जन होण्याचा अंदाज आहे. सुमारे 85 ठिकाणी घाटावर गणपतीचं विसर्जन करण्यात येणार आहे. दरवर्षी अनेक तास या मिरवणुका सुरु असतात मात्र या वर्षी लवकरात लवकर विसर्जन मिरवणूक संपवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं अमिताभ गुप्ता म्हणाले.
गणेश विसर्जन मिरवणूक 2022 : पुणे शहरातील 17 रस्ते राहणार वाहतुकीसाठी बंद
