नरेंद्र मोदींना भेटल्यावर एखाद्या महापुरुषाला भेटल्यासारखं वाटतं -चंद्रशेखर बावनकुळे
पुणे:दोन वर्षानंतर राज्यात गणपतीचा उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. सामान्य नागरिक ते वेगळ्या पक्षातील नेते वेगवेगळ्या मंडळांना भेट देऊन आरती व भेट देत आहेत. आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी
पुण्यातील मानाचा पहिल्या कसबा गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्याबरोबर भाजपा आमदार सिद्धार्थ शिरोळे, ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष योगेश टिळेकर , भाजपाचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक व भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,परवा मोदीजींना सहपरिवार भेटायला गेलो होतो. त्यावेळी त्यांनी मला 22 मिनिटं वेळ देत माझ्यासोबत आपुलकीने संवाद साधला. ती माझ्यासाठी आयुष्यभराची पुंजी आहे. नरेंद्र मोदींना भेटल्यावर एखाद्या महापुरुषाला भेटल्यासारखं वाटतं. असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,समाज संघटित झाल्याशिवाय त्या समाजामध्ये अन्याया विरोधात लढण्याची ताकद निर्माण होत नाही आणि मगच समाजाला न्याय मिळतो.समाज एकत्रित येणं आणि राहण गरजेचं. मला अभिमान आहे की देशाच्या सर्वोच्च पदावर ओबीसी समाजाचे नेते म्हणून नरेंद्र मोदी आहेत. तेली समाजाचे नेते आज देशाचे पंतप्रधान आहेत, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
नरेंद्र मोदी यांनी देशातील 70 कोटी युवकांना उभ करण्याचं स्वप्न पाहिलं आहे. आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील पिढी घडवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. अमेरिकेत आपली पोर ड्रायव्हर आणि वेटर झाली पाहिजेत.असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
