समाज कल्याण आयुक्त कार्यालयासमोर वंचित युवा आघाडी धरणे आंदोलन करणार
पुणे – वंचित बहुजन युवा आघाडी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्यावतीने समाज कल्याण आयुक्त कार्यालय पुणे येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
आज पुणे येथील शासकीय विश्रामगृह येथे पुणे शहरातील विविध महाविद्यालय आणि विद्यापीठमधील विद्यार्थी प्रतिनिधींची बैठक पार पडली. या बैठकीस वंचित बहुजन युवा आघाडी प्रदेश सदस्य अक्षय बनसोडे, प्रदेश सदस्य अफरोजभाई मुल्ला, वंचित बहुजन आघाडी पुणे शहराध्यक्ष मुनवर भाई कुरेशी यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. यावेळी वंचित बहुजन युवा आघाडीचे ओंकार कांबळे, अभिजीत बनसोडे, सम्यक विदयार्थी आंदोलन पुणे जिल्हा मा. महासचिव कौस्तुभ ओव्हाळ, अक्षय बचुटे गोटेगावकर, बारामती तालुका अध्यक्ष रोहित भोसले, काजत्र – गोकुळनगर प्रभाग अध्यक्ष मा. अविनाश लहाडे, हडपसर विधानसभा मतदार संघाचे प्रवक्ते मा. मिलिंद सरवदे, यांसह फर्ग्युसन महाविद्यालय, नेस वाडीया कॉलेज, SSPMS कॉलेज, TSSMS कॉलेज नऱ्हे, आझम कॅम्पस, DY पाटील आकुर्डी, SM जोशी कॉलेज, गरवारे कॉलेज, मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज, MCG सोसायटी, शाहु कॉलेज तसेच पुणे विद्यापीठ यांसह अनेक महाविद्यालय मधील विद्यार्थी प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी धरणे आंदोलनास मोठया संख्येने सहभागी होणार असल्याचे विदयार्थी प्रतिनिधी यांनी जाहीर केले.
खालील प्रमुख मागणीसह समाजकल्याण आयुक्त कार्यालय येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. आदी मागण्यांसाठी हे आंदोलन होणार आहे.
१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची रक्कम त्वरित वितरित करून चालू वर्षापासून योजनेची रक्कम वर्षाच्या सुरुवातीला देण्यात यावी.
२) परदेशी शिष्यवृत्ती लाभार्थी विद्यार्थ्यांची संख्या आश्वासन देऊन सुद्धा वाढवली नाही. ती वाढवून ५०० पर्यंत करण्यात यावी.
३) मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून आकारण्यात येणारी प्रवेश फि माफ करण्यात यावी.
