Wednesday, June 17, 2026
Latest NewsPUNE

Pune Festival – महिलांसाठीच्या लावणीने रसिक महिलांची मने तृप्त

पुणे : 34 व्या पुणे फेस्टिवलमध्ये यंदा खास महिलांसाठीच्या ‘तुझ्यात जीव रंगला’ या बालगंधर्व रंगमंदिर येथे झालेल्या लावणी कार्यक्रमाने रसिक महिलांची मने तृप्त केली. यामध्ये अर्चना जावळेकर, प्राची मुंबईकर, संगीता लाखे, किरण पुणेकर आणि नमिता पाटील या लोककलावंत नृत्यांगनानी सहकार्यांसमवेत सर्वांना मंत्रमुग्ध केले.

प्रारंभी ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी, सौ. मीरा कलमाडी, महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दीपप्रज्वलन केले. शशी कोठावळे हे याचे निर्माते आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी यांचा सत्कार यावेळी पैठणी व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. सौ. मीरा कलमाडी आणि महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. तसेच सिंहगड इंस्टीट्यूट सुगंधा नवले, बाल हक्क आयोगाच्या सदस्या जयश्री पालवे, उद्योगिका रोटरीअन मंजुषा फडके विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होत्या. संयोगिता कुदळे व दिपाली पांढरे यांनी याचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमात “तुझ्या उसाला लागल कोल्हा..”, “वाजले की बारा…”, “बुगडी माझी सांडली ग……”, “बाई वाड्यावर या…”, “रात रंगी राती रंगुनी चंद्रा…..”, अशा अनेक ठसकेबाज लावण्यांनी जोरदार टाळ्या व शिट्या मिळवल्या. महिलां प्रक्षालांमध्ये येवून या नृत्याग्नांनी सभागृहात जोश भरला.

“पुण्याचे नाव जगाच्या नकाशावर जावे यासाठी खा. सुरेश कलमाडी यांनी १९८९ मध्ये पुणे फेस्टिवल सुरु केला, त्या पहिल्या वर्षापासून माझा पुणे फेस्टिव्हलमध्ये सहभाग आहे असे सांगून ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी यांनी “पुणे फेस्टिव्हलच्या लावणी मंचावर झालेला सत्कार हा मी सर्वोच्च बहुमान मानते, असे नमूद केले.

रुपाली चाकणकर यांनी लीला गांधींचे अभिनंदन करून म्हटले की पुणे फेस्टिव्हलच्या माध्यमातून श्री सुरेश कलमाडी व सौ. मीरा कलमाडी यांनी पुण्याचे नव जगाच्या नकाशावर नेले. कलाकारांना मनाचे स्थान मिळाले. कन्या बचाव हा संदेश मोलाचा आहे असे त्या शेवटी म्हणाल्या.

शेवटी संयोजिका दिपाली पांढरे यांनी आभार प्रदर्शन केले. बालगंधर्व रंगमंदिर रसिक महिलांनी खचाखच भरले होते. पुणे फेस्टिव्हलचे बालगंधर्व रंगमंदिराचे समन्वयक श्रीकांत कांबळे या वेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading