अमित ठाकरे यांनी दिल्या पुण्यातील मानाच्या गणपतीसह विविध मंडळांना भेट
पुणे : दोन वर्षानंतर राज्यात गणपतीचा उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. सामान्य नागरिक ते वेगळ्या पक्षातील नेते वेगवेगळ्या मंडळांना भेट देऊन आरती व भेट देत आहेत. आज मनसेचे युवा नेते अमित ठाकरे यांनी पुण्यातील पहिला मानाचा गणपती कसबा गणपती, मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी, मानाचा तिसरा गुरुजी तालीम मित्र मंडळ, मानाचा चौथा गणपती तुळशीबाग मित्र मंडळ, मानाचा पाचवा गणपती केसरी वाडा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, अखिल मंडई मंडळ, व उपनगरातील मंडळांना अमित ठाकरे यांनी भेट देऊन आरती केली. यावेळी त्यांच्याबरोबर मनसेचे सारंग सराफ, मनसेचे पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर, आशिष साबळे पाटील , हेमंत संबूस, अजय शिंदे ,व मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
