उद्धव ठाकरे तुम्ही तुमच्या पोराची काळजी करा ; किरीट सोमय्या यांचे थेट चॅलेंज
पुणे : दोन वर्षानंतर राज्यात गणपतीचा उत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे. सामान्य नागरिक ते वेगळ्या पक्षातील नेते वेगवेगळ्या मंडळांना भेट देऊन आरती व भेट देत आहेत. आज भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व नेते किरीट सोमय्या यांनी पहिल्या मानाच्या कसबा गणपती चे दर्शन घेऊन आरती केली. त्यांच्याबरोबर भाजपचे पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक, गणेश घोष व भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
किरीट सोमय्या यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. किरीट सोमय्या म्हणाले,गेल्या वर्षी गणराया ला निरोप देत होतो तेव्हा मला अटक करण्याचा प्रयत्न झाला. आज सबंध महाराष्ट्र जेल मधून बाहेर आला आहे मी गणपती बाप्पाला प्रार्थना केली विघ्न हर्ता म्हणून आलो. असे किरीट सोमय्या म्हणाले.
तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या भूमिकेची चौकशी ताबडतोब सुरू करावी, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.मढस्टुडिओ घोटाळाप्रकरणी सरकारने मुंबई पालिकेचे अधिकारी व पर्यावरण अधिकारी यांचाही चौकशी करावी. अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे. त्यावर किरीट सोमय्या म्हणाले,उद्धव ठाकरे तुमचा उजवा हात जेल मध्ये गेला. तुम्ही तुमच्या पोराची . पोराची काळजी करा असे आवाहन किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांना केले आहे. तसेच मागील अडीच तीन वर्षात महाराष्ट्र राज्य माग गेला आहे.या राज्याला विकासाच्या पथावर घेऊन जाण्याची शक्ति दे हीच माझी गणरायाकडे प्रार्थना असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
उद्धव ठाकरे सरकारच जे स्मारक आहे.महाराष्ट्राच कलंक ट्विन रिसॉर्ट ते पडण्याच्या कामाला गती देण्यासाठी उद्या मी दापोली येथे जाणार आहे.तसेच गणराया समोर एकच सांगतो.दापोली येथील रिसॉर्ट दिवाळी अगोदर जमीनदोस्त झालेल असणार असल्याचे त्यांनी सांगितले.
