वी ने वी ऍपवर मल्टीप्लेयर व कॉम्पिटिटिव्ह गेमिंगचे नवे जग आपल्या ग्राहकांसाठी खुले केले
- आता वी ग्राहक मित्रमैत्रिणी व कुटुंबियांना आपल्यासोबत खेळण्यासाठी आमंत्रित करू शकतात, नॉन-वी युजर्सना देखील यामध्ये समाविष्ट करून घेता येईल.
- वी ऍपवर वी गेम्समध्ये युजर्स ग्रुप करून खेळू शकतील, स्पर्धांमध्ये भाग घेऊन आकर्षक बक्षिसे जिंकू शकतील.
ग्राहकांच्या सतत बदलत्या आणि वाढत्या नवनवीन आवडीनिवडींना अनुसरून वी या आघाडीच्या टेलिकॉम कंपनीने वी ऍपवर वी गेम्सअंतर्गत मल्टीप्लेयर आणि कॉम्पिटिटिव्ह गेमिंग कन्टेन्ट सादर केला आहे. मॅक्समटेक डिजिटल व्हेंचर्सच्या सहयोगाने लॉन्च करण्यात आलेल्या वी गेम्समध्ये आता ४० पेक्षा जास्त लोकप्रिय, स्पर्धात्मक आणि अतिशय कौशल्याने खेळण्याचे मल्टीप्लेयर गेम्स प्रस्तुत करण्यात आले आहेत. यामध्ये एक्स्प्रेस लुडो, क्विझ मास्टर, सॉलिटेयर किंग, गोल्डन गोल आणि क्रिकेट लीग यासारख्या खेळांचा समावेश आहे.
वी गेम्सवर मल्टीप्लेयर गेमिंगसाठी सहभागी होण्याच्या संधींमध्ये विस्तार करत वी ने ही सेवा नॉन-वी युजर्ससाठी देखील विस्तारली आहे. वी युजर्स स्वतःसोबत हे गेम्स खेळण्यासाठी कोणालाही आमंत्रित करू शकतात, मग ती व्यक्ती वी युजर असो वा नको.
गेमिंग पार्टनर मॅक्समटेक डिजिटल व्हेंचर्सच्या सहयोगाने वी गेम्सने तीन अनोख्या मोडमध्ये मल्टीप्लेयर व कॉम्पिटिटिव्ह गेम्स लॉन्च केले आहेत:
१. टूर्नामेंट मोड: लीडर बोर्डवरील सर्वोत्तम खेळाडूंसोबत हे गेम्स आमने सामने खेळले जाऊ शकतात.
२. बॅटल मोड: ऑनलाईन असलेल्या कोणाही सोबत युजर्स हे कॉम्पिटिटिव्ह गेम्स खेळू शकतात.
३. फ्रेंड्स मोड: यामध्ये स्वतःसोबत खेळण्यासाठी गेमर्स मित्रमैत्रिणी आणि कुटुंबियांना आव्हान देऊ शकतात किंवा आमंत्रित करू शकतात.
यामध्ये युजर्स रिवॉर्ड कॉईन्स जिंकू शकतात आणि जिंकलेले कॉईन्स अजून जास्त गेम्स खेळण्यासाठी, मोठ्या स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी किंवा आकर्षक भेटवस्तू मिळवण्यासाठी रीडीम करू शकतात.
वोडाफोन आयडियाचे चीफ मार्केटिंग ऑफिसर अवनीश खोसला यांनी सांगितले, “गेमिंग हा मनोरंजन विभागातील एक सर्वात मोठा भाग आहे आणि येत्या काही वर्षांमध्ये युजर्सकडून व्यतीत केला जाणारा वेळ व खर्च केला जाणारा पैसा या दोन्हींमध्ये गेमिंगची हिस्सेदारी अजून जास्त असेल अशी अपेक्षा आहे. आमच्या ग्राहकांसोबतचे आमचे नाते अधिक दृढ करण्यासाठी मोबाईल गेमिंग हा आमचा प्रमुख अजेंडा आहे. काही महिन्यांपूर्वी आम्ही वी गेम्सची सुरुवात केली आणि आता आम्ही सोशल किंवा मल्टीलेयर गेमिंगमध्ये पदार्पण करत आहोत. कधीतरी सहज म्हणून खेळणाऱ्या तसेच अतिशय गांभीर्याने खेळणाऱ्या गेमर्ससाठी वी हे पसंतीचे ठिकाण बनावे या आमच्या उद्दिष्टाच्या दिशेने हे पाऊल आपसूकच उचलले गेलेले आहे.”
“आमच्या युजर्ससाठी सर्व शैलींमधील वैविध्यपूर्ण कन्टेन्ट सादर करण्यासाठी सखोल एकीकृत भागीदारींवर आमचे वृद्धी धोरण आधारलेले आहे. आम्हाला पक्की खात्री आहे की, ही नवी भागीदारी आमच्या ग्राहकांचा गेमिंग अनुभव वृद्धिंगत करेल इतकेच नव्हे तर, आमच्या डिजिटल आराखड्यामध्ये देखील आम्हाला खूप पुढे घेऊन जाईल.”
वी ऍपवरील वी गेम्स ऍक्शन, ऍडव्हेंचर, आर्केड, कॅज्यूअल, एज्युकेशन, फन, पझल, रेसिंग, स्पोर्ट्स आणि स्ट्रॅटेजी या १० लोकप्रिय शैलींमधील १२०० पेक्षा जास्त अँड्रॉइड आणि एचटीएमएल५ वर आधारित मोबाईल गेम्ससह गेमिंगचा अनोख्या जगात घेऊन जाणारा अनुभव प्रदान करतात.
|
