Friday, June 19, 2026
BusinessLatest News

येस बँकेतर्फे एनआरई आणि एफसीएनआर निश्चित ठेवींवरील व्याजदरात वाढ

मुंबई : येस बँकेने आपल्या नॉन- रेसिडेंट एक्स्टर्नल अकाउंट (एनआरई) निश्चित ठेवींवरील व्याजदरात ५० ते ७५ बेसिस पॉइंट्सची वाढ केली आहे. ही वाढ रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) अतिरिक्त निधी प्रवाहाला चालना देण्यासाठी नुकत्याच केलेल्या घोषणेशी सुसंगत आहे. बँकेने फॉरिन करन्सी नॉन- रेसिडेंट (एफसीएनआर) ठेवींवरील व्याजदरात २० बेसिस पॉइंट्सची केली असून त्यामुळे एनआरआय ग्राहकांना त्यांच्या निश्चित ठेवींवर आकर्षक परतावे मिळतील.

१२ महिने ते १८ महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या एनआरई निश्चित ठेवींवरील दर प्रती वर्ष ७.०१ टक्के करण्यात आला आहे. त्याच्परमाणे १८ महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी ७.२५ टक्के प्रती वर्ष दर ठेवण्यात आला आहे. हे सुधारित दर ५ कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेसाठी लागू आहेत. त्याशिवाय बँकेतर्फे १२ महिने आणि २४ महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या, २४ महिने ते ३६ महिन्यांपेक्षा कमी कालावधीच्या युएसडी एफसीएनआर ठेवींवर ४.०५ टक्के, ४.२५ टक्के प्रती वर्ष दर पुरवला जाणार आहे.

सुधारित दरांविषयी येस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत कुमार म्हणाले, ‘येस बँकेतर्फे बँकेच्या उपक्रमांमध्ये कायमच नाविन्य आणि ग्राहकाभिमुखतेला केंद्रस्थान देण्यात आले आहे. आम्ही सर्व प्रकारच्या ग्राहकांना सातत्याने सर्वोत्तम लाभ मिळवून देतो. आरबीआयने फॉरेक्स निधी आकर्षित करण्यासाठी नुकत्याच जाहीर केलेल्या शिथिलीकरणानंतर आम्हाला आमच्या एनआरई आणि एफसीएनआर निश्चित ठेवींवरील व्याजदर वाढवण्याची व पर्यायाने ग्राहकांना लाभ मिळूवन देण्याची संधी मिळाली. हा उपक्रम बँकेने गेल्या काही काळात ग्राहकांना लाभ मिळवून देण्यासाठी हाती घेतलेल्या विविध उपक्रमांचा एक भाग आहे व त्यामुळेयेस बँकेचा रिटेल पोर्टफोलिओ विस्तारण्यासाठी तसेच त्यात आणखी वैविध्य आणण्यासाठी मदत होणार आहे.’

 

एनआरई निश्चित ठेवी आणि फॉरिन करन्सी नॉन- रेसिडेंटची (एफसीएनआर) महत्त्वाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत –

निकष

वैशिष्ट्ये (एनआरई निश्चित ठेवी)

वैशिष्ट्ये (एफसीएनआर)

निश्चित ठेवीची रक्कम

किमान – १०,००० रुपये

किमान.: परकीय चलनाचे १००० युनिट्स

कालावधी

१ ते १० वर्ष

१ ते ५ वर्ष

कर आकारणी आणि सहजपणे परत मिळवण्यायोग्य

भारतातील करारचनेपासून मुक्त आणि मोफतपणे परत करण्यायोग्य

भारतातील करारचनेपासून मुक्त आणि मोफतपणे परत करण्यायोग्य

एनआरई निश्चित ठेवी बुक करण्यासाठी ग्राहकांना येस बँकेच्या डिजिटल चॅनेल्सची मदत घेता येणार असून त्यात येस ऑनलाइन (नेट बँकिंग), येस मोबाइल (मोबाइल बँकिंग) किंवा येस रोबोट (पर्सनल बँकिंग चॅटबॉट) यांचा समावेश आहे. ग्राहक भारतात असल्यास त्यांना जवळच्या शाखेला भेट देता येईल किंवा इथे लिहिता येईल gib@yesbank.in (एआरआय व्यवहारांसाठी खास ईमेल आयडी)

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading